शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

पालिका प्रभाग आरक्षणाचा सरकारने मांडला खेळ...

By admin | Updated: September 16, 2015 02:31 IST

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांच्या प्रभागांचे आरक्षण करणारी अधिसूचना सरकारचे पालिका प्रशासन खाते अजूनही जारी करत नसल्याने

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांच्या प्रभागांचे आरक्षण करणारी अधिसूचना सरकारचे पालिका प्रशासन खाते अजूनही जारी करत नसल्याने राज्य निवडणूक आयोग चिंताग्रस्त झाला आहे. सरकार आरक्षण अधिसूचना जारी करण्यास मुद्दाम विलंब करत आहे, अशी लोकांची भावना बनली आहे. एकंदरीत जिल्हा पंचायत निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीवेळीही प्रभाग आरक्षणाशी सरकारने खेळ मांडल्याचे मत काही आजी-माजी नगरसेवकांचेही बनले आहे. पालिका प्रभाग आरक्षण करण्यापूर्वी गोवा नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करावी लागते. सरकारने ती दुरुस्ती केली. त्यासाठी वटहुकूमही जारी केला व राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी वटहुकुमावर सही करून चार दिवसांचा कालावधी लोटला. राजपत्रात मंगळवारी हा वटहुकूम व दुरुस्ती प्रसिद्ध झाली आहे. तथापि, असे असूनही सरकारचे पालिका प्रशासन खाते अजूनही प्रभाग आरक्षणाची अधिसूचना जारी करत नाही. प्रभाग आरक्षण झालेले आहे. मात्र, अधिसूचना जारी केली, तर त्यास कुणीही न्यायालयात आव्हान देतील, या भीतीने ती जारी केली जात नाही, अशी माहिती विशेष गोटातून मिळाली आहे. प्रथम ग्रामपंचायत निवडणुकीवेळी व मग जिल्हा पंचायत निवडणुकीवेळीही प्रभाग आरक्षण सरकारने ऐनवेळी जाहीर केले होते. या वेळी पालिकांमध्ये सरकारने ओबीसींना २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण वाढवले आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त डॉ. मुदस्सर यांना या प्रतिनिधीने विचारले असता, ते म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया येत्या ३० रोजी सुरू होईल. २५ रोजी आपण निवडणुकीची अधिसूचना जारी करेन. तत्पूर्वी म्हणजे दि. २३-२४ रोजी तरी प्रभाग आरक्षण अधिसूचना जारी व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची सगळी तयारी केली आहे. फक्त आरक्षण अधिसूचनेचीच प्रतीक्षा आहे. (खास प्रतिनिधी)