शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास मगोपचा पाठिंबा जाहीर, नद्यांमधील गाळ उसपणे गरजेचेच : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:05 IST

राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.

पणजी : नद्यांचे राष्ट्रीयीकरण हे गरजेचेच आहे. कारण राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.काही ग्रामसभा सध्या दबावाखाली येतात आणि नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेतात. राष्ट्रीयीकरण झाले म्हणजे गोमंतकीयांची नद्यांवरील मालकी जात नाही. सध्या गोव्यात राष्ट्रीय महामार्ग आहेत पण महामार्गाशी संबंधित सगळी कामे गोवा सरकारच करत असते. महामार्गाप्रमाणोच नद्यांचे असेल. राष्ट्रीयीकरणाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जे लोक कोकण रेल्वेला आणि मोपा विमानतळाला विरोध करत होते, तेच आता नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करत आहेत, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.मच्छीमारांना काही जण चिथावणी देत आहेत. साळ व अन्य नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यात खूप गाळ साठलेला आहे. केंद्र सरकारकडून निधी घेऊन हा गाळ काढावा लागेल. नद्या साफ कराव्या लागतील, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. नद्यांमधील गाळ काढला गेला तर त्याचा लाभ मच्छीमारांनाच होईल, असाही दावा ढवळीकर यांनी केला.भारतमालासाठी 7 हजार कोटीकेंद्र सरकार भारतमाला प्रकल्पासाठी सात हजार कोटी रुपये गोव्यात खर्च करणार आहे. आम्ही भारतमाला प्रकल्प राबवणार आहोत. त्याचा लाभ गोव्यातील नद्यांना आणि पर्यटन स्थळांनाही मिळेल. आम्ही भारतमाला प्रकल्प अंमलात आणताना लोकांना विश्वासात घेणार आहोत. लोकांची घरे पाडली जाणार नाहीत याची काळजी घेऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. नद्यांमधील गाळ उसपण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच आला होता. आपण तेव्हा गोव्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारमध्ये मंत्री होतो. मी या विषयाबाबत त्यावेळीच त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. विरोध होईल म्हणून त्यावेळी आम्ही हा प्रस्ताव मार्गी लावला नव्हता, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. सारमानस, बाणस्तारी फेरीबोट अनेकदा रुतत असते. केरी-तेरेखोलला देखील तसेच होते. नद्या उसपून मार्ग जर व्यवस्थित केले गेले तर नद्यांमधील वाहतूक चांगली होईल. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे आम्ही स्वागत करतो, असे ढवळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा