शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ट्रॉलरवरील 99% हून अधिक मच्छीमार बिगर गोमंतकीय, मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 13:32 IST

पणजी: गोव्यातील ट्रॉलरवर मासेमारी करणारे  99.99 टक्के  मच्छिमार हे  गोव्याबाहेरील आहेत. त्यामुळे त्यांना ओळखपत्रे देण्यासाठी मच्छिमार खात्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच एमपीटी आणि मच्छिमारांचा संघर्ष होत असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं आहे. गोव्यातील मच्छिमारांचा एमपीटीकडून छळ होत असल्याचे आमदार चर्चील आलेमाव यांनी मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांच्या नजरेस आणून दिले ...

पणजी: गोव्यातील ट्रॉलरवर मासेमारी करणारे  99.99 टक्के  मच्छिमार हे  गोव्याबाहेरील आहेत. त्यामुळे त्यांना ओळखपत्रे देण्यासाठी मच्छिमार खात्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच एमपीटी आणि मच्छिमारांचा संघर्ष होत असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं आहे. 

गोव्यातील मच्छिमारांचा एमपीटीकडून छळ होत असल्याचे आमदार चर्चील आलेमाव यांनी मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांच्या नजरेस आणून दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले. अद्याप सर्व मच्छिमारांना ओळखपत्रेही देणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

मच्छिमार जेटीच्या बांधकामाची सद्यस्थिती  काय आहे असा प्रश्न वस्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी विचारला होता. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय परिणाम अभ्यासही अद्याप केलेला नाही. तो केव्हा होईल असेही विचारले होते. त्यावर उत्तर देताना पालयेकर यांनी हा प्रकल्प एमपीटीच्या अखत्यारीत असल्यामुळे या विषयी आताच काही माहिती देणे शक्य होणार नाही.  जानेवारी महिन्यात विशेष बैठक घेऊन माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जेटीसाठी 75 टक्के खर्च केंद्र सरकार करीत असल्यामुळे जेटीचे बांधकाम हा पूर्णपणे केंद्रीय विषय आहे. परंतु ही जेटी गोव्यातील मच्छीमारांसाठी वापरास मिळाली पाहिजे यासाठी ती उपयोगास सुरूवात करण्यापूर्वीच त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे,आणि तो घेतला जाईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमार