शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मासळीचे आणखी 94 ट्रक तपासले, फॉरमॅलिनच्या प्रश्नावर एफडीएचे अधिकारी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 13:40 IST

परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले.

पणजी - परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले. ही मासळी दूषित नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्याचा दावा खात्याने केला आहे. त्यामुळे ही मासळी आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉरमॅलिन सापडले त्यामुळे आयातीवर बंदी घातली होती. ही बंदी 3 ऑगस्टपर्यंत लागू होती. शनिवारी बंदी उठल्यानंतर मासळीचे ट्रक तपासण्यात आले. त्यानंतर आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशी 94 तपासले. पोळें चेक नाक्यावर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच अन्य भागातून आलेले ट्रक तपासण्यात आले. तर पत्रादेवी चेकनाक्यावर महाराष्ट्र तसेच उत्तरेकडील अन्य राज्यांमधून आलेले मासळीचे 21 ट्रक तपासले. काल मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत ही तपासणी चालू होती. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्याचे अधिकारी हद्दीवर तैनात असतात. मासळी टिकविण्यासाठी फॉरमॅलिनचा वापर केला आहे का, त्याची तपासणी विशेष उपकरणाच्या सहाय्याने केली जाते.दरम्यान, मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात आता आयात सुरू झाल्याने परप्रांतीय मासळीही येऊ लागली आहे. परंतु गोव्यात मात्र स्थानिक मासळीच्या खरेदीवर भर दिला जात आहे. कुटबण, मालीम, कुठ्ठाळी, वास्को, शापोरा तसेच अन्य जेटींवर ट्रॉलर्स समुद्रात जाऊ लागले असून बांगडे, कोळंबी तसेच अन्य प्रकारची स्थानिक मासळी आता बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे.परप्रांतांतून गोव्यात विक्रीसाठी आणली जाणारी मासळी फॉरमॅलिन लावून साठविलेली असते असे उघड झाल्याने काही दिवसांपूर्वी राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने पंधरा दिवस आयातीवर बंदी घातली होती. फॉरमॅलिन घातक रसायन असून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पार्थिव देह टिकून राहावा यासाठी फॉरमॅलिन चा वापर शरीरावर केला जातो. या घातक रसायनामुुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फॉरमॅलिन लावलेले मासे खाणे अत्यंत धोकादायक आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कसून तपासणी करीत आहोत प्रसंगी प्रयोगशाळेतही पाठवून देते तपासणी होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गोव्याचा मासळी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होतो. असे असले तरी सध्या खराब हवामानामुळे ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत तसेच ट्रॉलर्स वर काम करणारे खलाशी  हे कर्नाटक, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातील असतात. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते तेव्हा हे कामगार गावी परत जातात. अनेकदा हे कामगार 15 ऑगस्ट नंतरच परत येतात त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी पूर्ण वेगाने सुरू होईल अशी शक्यता मांडवी फिशरमन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब यांनी लोकमतकडे बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या