शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

देशात आयुष मंत्रालयातर्फे आणखी 130 इस्पितळे, मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 19:30 IST

केंद्र सरकारने देशभरात आयुष मंत्रलयातर्फे एकूण 70 इस्पितळे मंजूर करण्यात आली आहेत. यापुढे आणखी 130 इस्पितळे मंजूर केली जातील. एकूण संख्या दोनशे केली जाईल, असे केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.

पणजी : केंद्र सरकारने देशभरात आयुष मंत्रलयातर्फे एकूण 70 इस्पितळे मंजूर करण्यात आली आहेत. यापुढे आणखी 130 इस्पितळे मंजूर केली जातील. एकूण संख्या दोनशे केली जाईल, असे केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.केंद्रीय मंत्री नाईक शुक्रवारी पणजीतील भाजप कार्यालयात उपस्थित राहिले व त्यांनी गोवाभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, की शासकीय पातळीवरून कामे जलदगतीने व्हावीत तसेच नोक-याही उपलब्ध व्हाव्यात, असे कार्यकर्त्यांना वाटते. एरव्ही आपण उत्तर गोव्याचे खासदार या नात्याने उत्तर गोव्यातील लोकांना भेटत होतोच. आता दक्षिण गोव्यातील लोकांनाही भेटण्याची संधी मिळत आहे.मंत्री नाईक म्हणाले, की उत्तर गोव्यात धारगळ येथे 2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आता आयुष मंत्रालयाच्या ताब्यात येऊ लागली आहे. पूर्वी जी जागा आम्हाला दिली गेली होती, ती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर योग्य वाटली नाही. त्या जागेत दरी आहे. शिवाय एवढे जंगल आहे की, तिथे जाताही येत नाही. मुख्य रस्त्यापासून ते खूप दूरही आहे. त्यामुळे आम्ही धारगळ येथेच दुस-या ठिकाणी 1 लाख 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा पाहिली. तसेच त्या बाजूची आणखी 80 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा घेतली. एकूण दोन लाख जागा राज्य सरकारने आम्हाला दिली आहे. अधिकृत प्रक्रिया सुरू आहे. मंत्रिमंडळासमोर येत्या पंधरा दिवसांत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल. अर्थ खात्याकडे फाईल गेली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले आहे.मंत्री नाईक म्हणाले, की धारगळ येथे पदव्युत्तर शिक्षणाचे आयुर्वेद महाविद्यालय येईल. हे महाविद्यालय 30 जागांचे असेल. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आणि नेचरोपथी ह्या संस्था उभ्या केल्या जातील. संशोधन केंद्र आणि योगाचे केंद्रही उभे केले जाईल. एकूण पाचशे कोटी रुपये खर्चाचा पहिला टप्पा असेल. दुस-या टप्प्यात वसतिगृह आणि अन्य सुविधा मिळून आणखी पाचशे कोटी रुपये खर्च केले जातील. विदेशी पर्यटकांना योगा, नेचरोपथी, आयुर्वेद यांचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे गोव्याचे पर्यटन वाढण्यासाठीही धारगळचा प्रकल्प मदतरूप ठरेल.मंत्री नाईक म्हणाले की, साखळी मतदारसंघातील वेळगे येथे आयुष मंत्रालयातर्फे इस्पितळ बांधले जाईल. त्यासाठी वेळगे येथील कोमुनिदादीची जागा मिळेल. कोमुनिदादीने ना हरकत दाखला दिला आहे. दक्षिण गोव्यात माकाझान येथेही आयुष मंत्रालयातर्फे इस्पितळ बांधले जाईल. दोन्ही इस्पितळांची कामे प्रत्यक्ष राज्य सरकार करून घेणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल