शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

‘मोपा’प्रश्नी समर्थक-विरोधक सक्रिय

By admin | Updated: January 25, 2015 01:42 IST

१ फेब्रुवारीला जनसुनावणी : उपस्थितीसाठी जोरदार प्रयत्न; दावे-प्रतिदावे सुरू

पेडणे : पेडणे तालुक्यातील होऊ घातलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टसंबंधी १ फेब्रुवारी रोजी मोपा पठारावर जी जनसुनावणी होणार आहे त्या सुनावणीला मोठ्या संख्येने समर्थक शेतकरी उपस्थित राहाणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच पेडणे तालुक्यातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन जनजागृती सुरू झाली आहे. मोपा विमानतळासाठी पर्यावरणीय परिणाम अभ्यासाच्या दृष्टीने १ फेब्रुवारी रोजी नियोजित मोपा विमानतळ पठारावर जनसुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पठारावर व्यवस्थित वाहने व जनसमुदायास उपस्थित राहावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. मोपा पठारावर दिवसभर जनसुनावणी चालणार आहे. या सुनावणीच्या वेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, कृषी संचालक, बांधकाम प्रधान मुख्य अभियंता, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस महानिरीक्षक, हवाई वाहतूक संचालक आदी हजर राहाणार आहेत. सासष्टी तालुक्यातील काही चार-पाचजण सध्या सायंकाळी मोपात येऊन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना भेटून मोपा विमानतळासाठी विरोध करा म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मोपातील या विमानतळामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार, निसर्गनिर्मित झाडे पर्यावरण नष्ट होईल, जलस्रोत साठे आटणार, अशी माहिती देण्याचे काम सध्या जोरदारपणे चालू आहे. पीपल फॉर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट संघटनेचे निमंत्रक देवेंद्र प्रभुदेसाई व सचिव अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर यांनी संयुक्तपणे माहिती देताना मोपा विमानतळासाठी संघटनेतर्फे यापूर्वीच गावागावांत बैठका घेऊन जनजागृती केलेली आहे. आता मोठ्या संख्येने समर्थक हजर राहावेत यासाठी बैठका चालू असल्याचे सांगितले. भाजपाचे नेते व्यंकटेश घोटगे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना १ फेब्रुवारी रोजी जी सुनावणी होणार त्या सुनावणीवेळी काही सासष्टी भागातून विरोधक उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती मिळालेली आहे; परंतु मोपा समर्थक या जनसुनावणीला मोठ्या संख्येने हजर राहाणार व पेडणे भाजपा मंडळ प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. रस्त्याचे काम युद्धपातळीवर मोपा पठारावर जाण्यासाठी सध्या नवीन रस्ता करण्याचे काम चालू आहे. रस्ता विभाग पेडणेचे अभियंते नारायण मयेकर जातीने लक्ष ठेवून आहेत. (प्रतिनिधी)