शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

'मोपा', 'आयुष इस्पितळ' विकासाचे डबल इंजिन; मुख्यमंत्री सावंत यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 12:55 IST

भूमीपुत्रांना मोपा विमानतळावर बाराशे नोकऱ्या दिल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेः राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे ठरणारे प्रकल्प म्हणजे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि धारगळ येथील आयुष इस्पितळ प्रकल्प आहेत. ते एकप्रकारे विकासाचे डबल इंजिन आहेत. त्याद्वारे राज्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे विकास यात्रा २०२३ अंतर्गत संपूर्ण गोव्यात जे मोठे प्रकल्प उभारले त्या प्रकल्पांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या राज्यातील मोठ्या प्रकल्पांना भेटी देऊन हे प्रकल्प गोव्यातील जनतेला कळावे, हा हेतू ठेवून आज या प्रकल्पाला आम्ही भेट दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धारगळ येथील आयुष इस्पितळ प्रकल्पाला भेट कार्यक्रमावेळी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार प्रमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, तुळशीदास गावस मधुकर परब, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, मनोज हरमलकर, वारखंड - नागझरचे सरपंच गौरी जोसलकर, विनडाचे सरपंचसुजाता ठाकूर, इब्रामपूरचे सरपंच अशोक धावस्कर, खाजने अमेरे पोरस्कडेचे सरपंच निशा हळदणकर, वझरीचे सरपंच अनिल शेट्ये, उपसरपंच संजना परब, शामिका नाईक कविता कांबळी, मयूरी तुळस्कर, रूपेश मावळणकर, सिद्धी राऊळ, सागर राऊळ, सूर्यकांत तोरस्कर, रमेश सावळ व इतर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयुर्वेद संस्थेच्या प्रमुख डॉ. सुजाता कदम यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ओपीडी व अन्य विभागाला मुख्यमंत्री.. केंद्रीयमंत्री, आमदारांनी भेटी देऊन रुग्णांकडे चर्चा केली व इस्पितळाची पाहणी केली.

श्रीपाद नाईक यांनाच दोन्ही प्रकल्पांचे श्रेय : मुख्यमंत्री

केंद्र सरकारचा १ आयुष इस्पितळ मोपा विमानतळ प्रकल्प केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नामुळे साकार होऊ शकले. त्यांना लोकांनी पाठिंबा द्यावा. आयुष इस्पितळात पदवी तसेच पदव्युत्तर आयुर्वेदातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. पंचकर्म आणि इतर आयुर्वेदातील विविध विभाग या ठिकाणी कार्यरत होईल.

प्रकल्पांत नोकऱ्यांची संधी

स्थानिकांना तसेच गोमंतकीय युवा-युवतींना मुलाखती घेऊन नोकया दिल्या जातील. आगामी काही दिवसांत वरील दोन्ही प्रकल्पांत राज्यातील युवक, युवतींना मोठया प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

भूमीपुत्रांना मोपा विमानतळावर बाराशे नोकऱ्या दिल्याचा दावा

राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आहे. हा प्रकल्प केवळ देशात नव्हे, तर विमानतळ प्रकल्पांत विशेष असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची खरी ओळख जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांनीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मोपा येथील विमानतळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांची यादी, विकासात्मक पुस्तिका जनतेपर्यंत घरोघरी पोहोचवण्यासाठी भाजपातर्फे संपर्क ते समर्थन या उपक्रमांतर्गत भाजपचे आमदार, मंत्री, नेते ठिकठिकाणी प्रत्येक मतदारसंघात भेटी देत आहेत. त्याच अनुषंगाने विकास यात्रेतर्गत मुख्यमंत्री सावंत यांनी मोपा येथील विमानतळ, धारगळ येथील आयुष इस्पितळ प्रकल्पांना भेटी दिल्या व लोकांना त्याचे महत्त्व सांगितले.

मांद्रे येथे लवकरच पोलिस स्टेशन?

मांद्रे मतदारसंघासाठी मंजूर झालेले पोलिस स्टेशन कधी होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले, मांद्रे मतदार संघासाठी लवकरच पोलिस स्टेशन उभारले जाईल. विकास पर्व या अंतर्गत भाजप सरकारने आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा आणि जनतेला माहिती मिळावी, यासाठी ही यात्रा सुरु केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशामध्ये आर्थिक स्थिती भक्कम होत आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकल्पातून विकास होत आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक प्रकल्प सुरु केलेले आहेत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्थानिकांना नोकऱ्यांत यापुढेही संधी मिळणार

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना तसेच भूमिपुत्रांना किती नोकऱ्या मिळाल्या? असा प्रश्न स्थानिक पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, तब्बल १,२०० नोकया या स्थानिकांना मिळालेल्या आहेत आणि यापुढेही मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा द्या

लोकसभेच्या आगामी निवडणुकीतही केंद्रात भाजप सरकार बहुमताने निवडून येईल. तसेच राज्यातील दोन्ही खासदारांना उत्तरेतून श्रीपाद नाईक आणि दक्षिणेतूनही जो उमेदवार असेल त्यांना बहुमतांनी निवडून द्या. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

भाजपामुळे प्रकल्पांचे काम गतिमान: तानावडे

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, भाजप सरकारच्या केंद्रातील ९ वर्षाच्या कारकिर्दीत विकासकामे झाली, त्यांची माहिती विकास यात्रेनिमित्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सरकार करीत आहेत. विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळPramod Sawantप्रमोद सावंत