शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

एका मातेचे राक्षसी कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 07:52 IST

बातमी वाचून व ऐकून पूर्ण गोवा सुन्न झाला.

एका ३९ वर्षीय सुशिक्षित मातेने आपल्या चार वर्षाच्या बाळाचा खून केला. बातमी वाचून व ऐकून पूर्ण गोवा सुन्न झाला. काहीजणांचे डोळेही भरून आले. एका स्टार्टअपची सीईओ असलेली माता अशा प्रकारे वागते तेव्हा शिक्षण व्यवस्थेचाही पराभव होतो. आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी चारवर्षीय चिमुकल्याचा जीव घेणारी आई ही माता किंवा महिला म्हणण्याच्याही पात्रतेची राहत नाही. पाषाणहृदयी असे वर्णनदेखील कमी पडेल. पतीचा कितीही दोष असला तरी या महिलेने केलेल्या कृत्याचे समर्थन होत नाही. राक्षसी कृत्याविषयी तिला लवकर शिक्षा व्हावी, अशीच अपेक्षा सर्व संवेदनशील महिला व्यक्त करतील, एकूणच समाजातील हिंसा, क्रौर्य वाढतेय, ज्या दिवशी बाळाचा खून करणाऱ्या महिलेची बातमी आली, त्याच दिवशी आणखी एक खून प्रकरण उघडकीस आले. नेसाय-सासष्टी येथे पुतण्याने काकीचे जीवन संपविले अशी ती घटना. मालमत्तेवरून वाद झाला. 

३४ वर्षीय पुतण्याने आपल्या ५३ वर्षीय काकीचा खून केला, जग बदलतेय, सुशिक्षित होतेय, सगळेच उच्चशिक्षण घेऊ लागलेत, डिजिटल इंडियाच्या जगात आपण पोहोचलो. चंद्रावर स्वारी केली. मात्र माणूस एकमेकांचे गळे कापण्यात, जीव घेण्यातही खूप पुढे पोहोचला आहे. अमानुषता कमी होत नाही ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. संस्कार, मूल्य, नीतिमत्ता, त्याग हे शब्द पुस्तकांमध्येच सुकलेली शाई बनून राहिले आहेत.

गेल्याच आठवड्यात मिरामार येथे आपल्या अर्भकाला उन्हात बेवारस सोडून एक महिला गायब झाली होती. समाजाकडून आपल्या वाट्याला अपमान, अवहेलना, कुचेष्टा येईल असा विचार करून मातेने अर्भकास सोडून दिले. तिला पोलिसांनी नंतर पकडले. कोणत्याच महिलेवर असे करण्याची वेळ येऊ नये. काहीवेळा मुलासह मातेने आत्महत्या केल्याच्या वार्ता ऐकायला मिळतात. आता तर चार वर्षाच्या बाळाचा खून करून आई शांतपणे पळून जाते, आपले राक्षसी कृत्य लपवू पाहते. ही मानसिकता एका आईच्या अंगी कशी येते, असा प्रश्न समाजाला पडतो, कवी ग्रेस यांच्या कवितेतून आईविषयीची आत्यंतिक भावना व्यक्त झालेली आहे. अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे. ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मीही घडलो... वगैरे अनेकांनी आईचा त्याग, आईचे अपार कष्ट, माया-ममता याविषयी प्रचंड लिहून ठेवले आहेत, जगात कुठेही गेलो तरी, आईच्या वेदना, त्याग-ममता समान असते. कोणत्याही जाती धर्मातली आई ही आईच असते ती मुलांसाठी अपार कष्ट-वेदना सहन करत असते. 

मात्र अलीकडील घटना मनाचा थरकाप उडविणाऱ्या ठरतात. अनेकदा आई-वडिलांमधील कटुता, त्यांच्यातील नात्याचा दुरावा, त्यांच्यातील संघर्ष व भांडणे याचा मुलांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. कथित शिक्षित व उच्चशिक्षित पालकांनादेखील हे कळत नाही. डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा आयआयटी शिक्षित असे पालकदेखील काहीवेळा ज्या पद्धतीने वागतात ते पाहिले की, शिक्षणातून माणूस घडतो या वाक्यातील पोकळपणा लक्षात येतो. मुलाला आपली किडनी देऊन त्याचे जीव वाचवणारी माता याच समाजात वावरते, पतीला आपले मूत्रपिंड देऊन त्याला जीवदान देणारी पत्नी आपल्याच अवतीभवती आढळते. त्यागाच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. 

चार वर्षाच्या अत्यंत निष्पाप, अजाण बालकाचा जीव घेणारी जन्मदात्री मात्र कुणाच्या वाट्याला येऊ नये. आपली आई आपला जीव घेत असताना त्या बालकाला किती वेदना झाल्या असतील? किती त्रास झाला असेल? किती भयानक असेल ते क्रौर्य असे विचारदेखील सामान्य माणसाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत. माइंडफूल एआय लॅबच्या सीईओ असलेल्या सूचना सेठ हिला पोलिसांनी अटक केली. सिकेरी-बार्देश येथील हॉटेलमध्ये तिने मुलाचे जीवन संपविले व भाड्याची टॅक्सी घेऊन सोमवारी चित्रदुर्ग कर्नाटकला गेली. बॅगेत मुलाचे प्रेत घेऊन जाणारी ही बाई उलट्या काळजाचीच म्हणावी लागेल, एआय एथिक्स २०२१ च्या १०० ब्रिलियंट महिलांमध्ये तिचा समावेश होतो, हे एका वेबसाइटवर वाचून संताप आणखी वाढतो.

टॅग्स :goaगोवा