शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

मंत्र्यांची कारवाई, डॉक्टर निलंबित; गोमेकॉ इस्पितळास विश्वजीत राणे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:54 IST

डॉक्टरला फैलावर घेतल्यानंतर राज्यभर चर्चा आणि वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना योग्य वागणूक मिळत नाही, तासनतास रांगेतच उभे राहावे लागते, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी सकाळी अचानक इस्पितळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांशी समाधानकारक पद्धतीने न वागल्याबद्दल एका डॉक्टरला आरोग्यमंत्र्यांनी जाब विचारला व निलंबित करण्याचा आदेशही दिला.

मंत्री राणे हे गोमेकॉत आकस्मिक भेट देऊन पाहणी करीत असताना एका पत्रकाराचा त्यांना फोन आला. आपण नातेवाईकाला घेऊन गोमेकॉत आलो असता तेथील एका मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने (सीएमओ) वाईट वागणूक दिल्याची तक्रार संबंधित पत्रकाराने आरोग्यमंत्र्यांकडे केली.

आपल्याशी डॉक्टर असभ्य वागले असून शहर आरोग्य केंद्रात जाण्यास सांगत असल्याचेही त्याने आरोग्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी त्वरित संबंधित मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला (सीएमओ) बोलवून त्याला जाब विचारला व त्याला निलंबित करण्याचा आदेश गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांना दिला. सूत्रांकडून मिळालेल्या आदेशानुसार, डॉ. रुद्रेश यांचा निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आकस्मिक भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, लोकांची सेवा करू न शकणाऱ्या डॉक्टरांचे गोमेकॉत काहीच काम नाही. त्यामुळे अशी कारवाई करावी लागली.

गोमेकॉत एमबीबीएस व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरना बॉन्डवर असताना राज्यातील ग्रामीण भागातील इस्पितळात पाठविले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. गोमेकॉतील निवासी डॉक्टर्स आणि ज्येष्ठ डॉक्टर्सच्या वेतनवाढीचे संकेतही मंत्री राणे यांनी बोलून दाखवले. गोमेकॉत अकस्मिक भेटीवेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली. गोमेकॉचे डॉक्टर चांगले काम करतात. परंतु काही डॉक्टरांमुळे लोकांना त्रास होतो. मात्र, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या बाबतीत डॉक्टरांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही राणे म्हणाले.

आरोग्यमंत्री आणि डॉ. रुद्रेश यांच्यातील संवादाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यात आरोग्यमंत्री डॉ. रुद्रेश यांना सरळ उभे राहायला सांगतात आणि तोंडावरील मास्क काढायला सांगतात. जे काही स्पष्टीकरण द्यायचे असेल ते चौकशीवेळी द्या किंवा न्यायालयात द्या. मी आरोग्यमंत्री असेपर्यंत तरी निलंबन कायम राहणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांना इस्पितळातून थेट घरी जाण्यास सांगितले. अन्यथा सुरक्षांना सांगून बाहेर काढण्यात येईल, असा इशाराही दिला.

मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून गोमेकॉतील डॉक्टरचा करण्यात आलेल्या अवमानाबद्दल मेडिकल काउन्सील ऑफ इंडियाने निषेध केला आहे. एका पत्रकाराच्या तक्रारीवरून आरोग्यमंत्री राणे यांनी एमर्जन्सी वॉर्डमध्ये प्रवेश करणे आणि त्या ठिकाणी सेवा बजावत असलेल्या डॉक्टरला दोषी ठरवून ऑन कॅमेरा निर्भत्सना करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधित मंत्र्यांनी डॉक्टरला एक शब्दही बोलू दिला नाही ही मनमानी असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

संपाचा इशारा...

गोमेकॉतील घटनेची दखल अखिल भारतीय वैद्यकीय महासंघाने घेतले आहे. मंत्र्यांनी डॉक्टरांना ज्या प्रकारे वागणून दिली ती अत्यंत चुकीची आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी संबंधित डॉक्टरची माफी मागावी, अन्यथा संपाचा इशारा महासंघाने दिला आहे. या प्रकरणात पारदर्शी चौकशी व्हावी तसेच इस्पितळाच्या आपत्कालीन विभागात बिगर वैद्यकीय व्यक्तींच्या प्रवेशास मज्जाव करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, अशी मागणी महासंघाने केली आहे.

... म्हणून मी बोललो : राणे

सोशल मीडियामधून टीका झाल्यानंतर मंत्री विश्वजीत राणे यांनी रात्री आपले स्पष्टीकरण जारी केले. मी एका ज्येष्ठ महिलेची बाजू घेतली. तिला योग्य वागणूक न मिळाल्याने मी संतापलो, मी ज्या पद्धतीने सीनियर डॉक्टरशी संवाद साधला, त्याबाबतची जबाबदारी मी घेतो व पुन्हा अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही, अशी हमी देतो असे मंत्री राणे यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. मात्र ज्या ज्येष्ठ रुग्ण महिलेची गोमेकॉत काळजी घ्यायला हवी होती, ती घेतली गेली नाही व त्यामुळे मी अशा महिलेची साथ दिली, त्याविषयी मात्र मी माफी मागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटल