शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात खनिज वाहतुकीचा वाद ; वातावरण तंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:39 IST

आपल्याला प्रती किलोमीटर खनिज वाहतुकीसाठी साडेबारा रुपये दर मिळायला हवा अशी मागणी ट्रक व्यवसायिकांनी लावून धरून आंदोलनच सुरू केल्यानंतर मंगळवारपासून विषय गंभीर बनू लागला आहे.

पणजी : आपल्याला प्रती किलोमीटर खनिज वाहतुकीसाठी साडेबारा रुपये दर मिळायला हवा अशी मागणी ट्रक व्यवसायिकांनी लावून धरून आंदोलनच सुरू केल्यानंतर मंगळवारपासून विषय गंभीर बनू लागला आहे. सेझा गोवा कंपनीने आंदोलकांना जास्त न जुमानता दक्षिण गोव्यातील कोडली येथे पोलिस बंदोबस्तात खनिज वाहतूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण तंग बनले आहे.

खनिज वाहतूक आणि ट्रक मालकांचा वाद यावर कसा उपाय काढावा हे आता सरकारलाही कळेनासे झाले आहे. खनिज व्यवसायिक दरवाढ, डिझेल व अन्य मागण्यांबाबत ताठर भूमिका घेतात आणि दुसर्‍याबाजूने खनिज कंपन्याही सरकारी सूचनांना मोठीशी दाद देत नाहीत. यामुळे प्रश्न चिघळू लागला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

सरकारने यापूर्वी काही ट्रक व्यवसायिकांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. कायदा हाती घ्याल तर खबरदार असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खनिज वाहतूक रोखू पाहणाऱ्या ट्रक व्यवसायिकांना बजावले आहे पण त्याचा ट्रक मालकांवर परिणाम झालेला दिसत नाही. दरवाढ आणि अन्य विषयांबाबतच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमच्या भागात खनिज वाहतूक करू देणार नाही अशी भूमिका ट्रक मालकांनी घेतली आहे. यामुळे खाण कंपन्या सध्या पोलिस बळाचा वापर करू पाहत आहेत. काही भागांत तर उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांवरही ताण येऊ लागला आहे. अनेक खाणींच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारने खाण कंपन्यांशी चर्चा करून पहिल्या दहा किलोमीटरसाठी प्रती किलोमीटर प्रती टन साडेबारा रुपये असा वाहतुकीचा दर ठरवला आहे. दहानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी कमी दर ठरविण्यात आला आहे. ट्रक व्यवसायिकांना हा फाॅर्म्युला मान्य नाही. यामुळे वाद वाढत आहे. खाणपट्ट्यातील काही आमदारही ट्रक व्यवसायिकांच्याबाजूने आहेत.

दरम्यान सकाळी सहापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत (शाळा  भरण्याची व सुटण्याची वेळ वगळून ) खनिज वाहतूक सुरू ठेवू देण्याचा सरकारचा निर्णय काही ग्रामपंचायतींना मान्य नाही. त्यानी ग्रामसभांमध्ये विरोधात ठराव घेतले आहेत.

टॅग्स :goaगोवा