शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

खाण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत न्यायालयात हजर, पुढील सुनावणी २७ एप्रिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 20:34 IST

२0१४ च्या कथित खाण घोटाळा प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आज सोमवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांच्याकडून वैयक्तीक वीस हजार रुपयांचे हमीपत्र घेतले. या खटल्याची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.

मडगाव - २0१४ च्या कथित खाण घोटाळा प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे आज सोमवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांच्याकडून वैयक्तीक वीस हजार रुपयांचे हमीपत्र घेतले. या खटल्याची पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.मागच्या सुनावणीच्या वेळी मडगावचे आमदार कामत हे गैरहजर राहिल्याने दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष सायनोरा लाड यांनी त्यांच्याविरोधात नव्याने समन्स जारी केले होते. डॉ. प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा हे अन्य संशयित आहेत. काल सुनावणीच्या वेळी हेदे हे हजर नव्हते. न्यायालयाकडून त्यांनी हजर न राहण्यासंबधी सूट मिळविली होती. कामत यांच्यावतीने वकील प्रवित्रन यांनी बाजू मांडली.डॉ. हेदे यांच्या कुळे येथील खाण सुरु करण्यासाठी बेकायदेशीररित्या ‘कंडोनेशन आॅफ डिले’ची सवलत देऊन बेकायदेशीररित्या लीज परवान्याचे नुतनीकरण केल्याचा भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या एसआयटीने कामत व अन्य दोघांवर आरोपपत्र दाखल केले आहे.२७ फेब्रुवारीला या प्रकरणाची मागणी सुनावणी झाली होती. यावेळी डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्यावतीने अ‍ॅड. योगेश नाडकर्णी तर अँथनी डिसोझा यांच्यावतीने अ‍ॅड. एस. भांगी न्यायालयात उपस्थित होते. कामत हे त्यावेळी अमेरिकेत असल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नव्हते.कामत यांच्यासह हेदे व डिसोझा यांच्याविरुध्द खाण कायदयाखाली कारस्थान रचणे, फसवणुक करणे व भ्रष्टाचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी एसआयटीच्यावतीने सरकारी अभियोक्ता तसेच स्वत एसआयटीचा तपास अधिकारीही हजर नव्हता. न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी तपास अधिकाऱ्याला हजर राहण्याचा आदेश जारी केला होता.गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयितांविरुध्द आरोपपत्र दाखल केले आहे. १५७२ पानाचे हे आरोपपत्र असून, त्यात ४0 साक्षिदारांच्या जबान्या जोडलेल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळा