शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नैसर्गिक आपत्तीतही खाण अवलंबितांना मिनरल फंडअंतर्गत मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 20:13 IST

जिल्हा मिनरल फंडचा वापर हा खाणग्रस्त भागांतील लोकांसाठी कोणकोणत्या कारणास्तव केला जाईल हे सरकारच्या खाण खात्याने शुक्रवारी तपशीलाने जाहीर केले आहे.

पणजी - जिल्हा मिनरल फंडचा वापर हा खाणग्रस्त भागांतील लोकांसाठी कोणकोणत्या कारणास्तव केला जाईल हे सरकारच्या खाण खात्याने शुक्रवारी तपशीलाने जाहीर केले आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे जर मालमत्तेची किंवा मानवी हानी झाली तर जिल्हा मिनरल फंडअंतर्गत खाणपट्टय़ातील लोकांना मदत केली जाणार आहे. तसेच एखाद्या नैसर्गिक आपत्तीवेळी जर खाणपट्टय़ातील कुणाचीही हानी झाली तरी मिनरल फंडअंतर्गत निधीचा वापर केला जाईल.

जिल्हा मिनरल फंडमध्ये राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमधून एकूण 18क् कोटींपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. उत्तर गोव्यासाठी 93 कोटी 8क् लाख रुपये तर दक्षिण गोव्यासाठी 86 कोटी 49 लाख रुपये जमा झाले आहेत. खाणपट्टय़ातील लोकांच्या कल्याणासाठीच हा निधी वापरायचा आहे. खाण खात्याने त्याविषयी जागृती सुरू केली असून अर्थसाह्याचा लाभ लोकांना देण्याच्या हेतूने लोकांकडून खात्याने अर्ज मागितले आहेत.

खाणग्रस्त भागांमध्ये वृक्षलागवड करणो, पर्यावरणाची झालेली हानी भरून काढणो, आरोग्य सुविधा किंवा शिक्षण सुविधा पुरविणो यासाठी जिल्हा मिनरल फंडमधील पैसा वापरला जाणार आहे. रस्ता किंवा पुल बांधणो, नद्या आणि धरणांसह अन्य जलसाठे किंवा जल ोतांमधील गाळ काढणो, प्रदूषण नियंत्रणविषयक उपकरणो बसविणो, शेती व्यवसायासाठी मदत करणो, तसेच पशूपालन, बागायती, दुध उत्पादन यासाठी मदत करणो यासाठीही जिल्हा मिनरल निधी वापरला जाईल, असे खाण खात्याने म्हटले आहे. खाण पट्टय़ातील लोकांना पर्यायी रोजगार संधी देणो, जमिनीची झालेली हानी भरून काढणो, जनावरांचा दवाखाना पुरविणो, गुरांसाठी चारा उपलब्ध करणो तसेच खाणपट्टय़ात पुराचे पाणी बाहेर फेकण्यासाठीची व्यवस्था उभी करणो, ज्यांना खाणींपासून झळ बसली त्यांना मदतीचा हात देणो यासाठी जिल्हा मिनरल फंडमधील निधी वापरला जाईल.

मायनिंग कॉरिडोरही बांधणार (चौकट)

जिल्हा मिनरल फंडमधून पैसा वापरून गोव्यातील जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मायनिंग कॉरीडोर बांधला जाईल हेही खाण खात्याने नमूद केले आहे.  तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेखाली ठरवून दिलेले लक्ष्य गाठणो किंवा हेतू साध्य करणो यासाठीही निधी वापरला जाणार आहे. जलसिंचनाची पर्यायी सुविधा निर्माण करणो, पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था, सार्वजनिक जागा स्वच्छ करणो, गटार बांधकाम, मलनिस्सारण प्रकल्प, मायनिंग कॉरीडोरच्या बाजूने कायमस्वरुपी देखरेख व्यवस्था उी करणो, पिण्याचे पाणी पुरविणो, मुले, वृद्ध, अपंग व्यक्ती व महिलांचे कल्याण करणारे उपक्रम राबविणो,समाज कल्याणाच्या योजना आखणो, कौशल्य विकसित करणो असेही उपक्रम जिल्हा मिनरल फंडमधून राबविले जाणार आहेत. 

जिल्हा मिनरल फंडखाली समितीची आणखी बैठक झालेली नाही. यापूर्वी एक-दोन बैठका झाल्या. ग्रामपंचायतींकडून अजून कुठलाही ठराव आलेला नाही. निधी अंतर्गत कामासाठी अजून अर्ज आलेले नाहीत. यापुढे ते येतील.

- आमदार दीपक प्रभू पाऊसकर

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या