राज्यपालांकडून मिकीचा दयेचा अर्ज सरकारकडे

By Admin | Updated: July 1, 2015 00:56 IST2015-07-01T00:56:09+5:302015-07-01T00:56:23+5:30

पणजी : तुरुंगात असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांचा दयेचा अर्ज राज्यपालांनी आता राज्य सरकारचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे पडताळणी करून पाहण्यासाठी पाठवून दिला आहे.

Mikey's mercy petition to the governor | राज्यपालांकडून मिकीचा दयेचा अर्ज सरकारकडे

राज्यपालांकडून मिकीचा दयेचा अर्ज सरकारकडे

राज्यपालांकडून मिकीचा दयेचा अर्ज सरकारकडे
पणजी : तुरुंगात असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांचा दयेचा अर्ज राज्यपालांनी आता राज्य सरकारचे मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे पडताळणी करून पाहण्यासाठी पाठवून दिला आहे.
पाशेको यांनी यापूर्वी पॅरोलवर ३० दिवसांसाठी आपली सुटका केली जावी, अशी विनंती करणारा अर्ज मागे घेतला आहे. आपल्याला उर्वरित शिक्षा माफ करावी म्हणून त्यांनी दयेचा अर्ज राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे केला. हा अर्ज त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे केला नाही. कारण कायद्यानुसार दयेचा अर्ज हा राज्यपालांकडेच करावा लागतो. राज्यपालांच्या कार्यालयाने या अर्जावर अजून कोणताच महत्त्वाचा निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी निर्णय घेण्यापूर्वी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यानुसार राज्यपालांच्या कार्यालयाने मंगळवारी मिकीचा अर्ज मुख्य सचिवांकडे पाठविला आहे. पाशेको यांना शिक्षा माफ करणे वगैरे गरजेचे आहे काय, हे मुख्य सचिवांकडून पाहिले जाईल. त्यांच्याकडून पोलीस अहवालही घेतला जाणार आहे. त्यानंतर ही फाईल राज्यपालांकडे जाईल. त्या वेळी राज्यपाल आपला निर्णय घेतील.(खास प्रतिनिधी)

Web Title: Mikey's mercy petition to the governor