शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

म्हादई पाणी प्रश्न : लवादासमोर अंतरिम दिलासा मागण्याचा येडीयुरप्पांचा आग्रह, 6 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तीवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 20:08 IST

म्हादई पाणीतंटा प्रश्नी येत्या 6 फेब्रुवारीपासून पाणी तंटा लवादासमोर गोवा व कर्नाटकचे अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहेत.

पणजी : म्हादई पाणीतंटा प्रश्नी येत्या 6 फेब्रुवारीपासून पाणी तंटा लवादासमोर गोवा व कर्नाटकचे अंतिम युक्तीवाद सुरू होणार आहेत. मात्र म्हादई पाणी वाटपाचा वाद सध्या या दोन्ही राज्यांमध्ये वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजपाचे कर्नाटकमधील नेते येडीयुरप्पा यांनी कर्नाटक सरकारने आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आधारे लवादाकडे जाऊन पाणी वाटपाविषयी लवादाकडून अंतरिम दिलासा मागावा, अशी मागणी शनिवारी कर्नाटकमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे.

कर्नाटक राज्यातील राजकीय नेते सध्या इरेला पेटले आहेत. गोव्यात येणा-या म्हादई नदीचे 7.5 टीएमसी पाणी आपण शक्य तेवढय़ा लवकर वापरण्यासाठी घ्यावे असे त्यांनी ठरवले आहे. लवादासमोर येत्या दि. 6 फेब्रुवारीला गोव्याच्यावतीने आत्माराम नाडकर्णी हे युक्तीवाद करणार आहेत. त्यांचे युक्तीवाद एक महिना चालतील. त्यानंतर कर्नाटकचे वकील युक्तीवाद करणार आहेत. लवादाचा निवाडा जून महिन्यात येण्याची शक्यता नाडकर्णी यांना वाटते. तथापि, कर्नाटकने सध्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रचे भांडवल चालवले आहे. येडीयुरप्पा यांनी तर शनिवारी कर्नाटकमध्ये सांगितले, की र्पीकर यांनी दिलेल्या पत्रविषयी आपण कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्या पत्रच्या आधारे म्हादईचे पाणी कर्नाटकला मिळेल. गोवा सरकारचा विरोध नाही. कर्नाटक सरकारने आता त्या पत्रच्या आधारे लवादाकडे जावे व अंतरिम आदेश मागावा. पर्रीकर यांच्या पत्रच्या आधारे कर्नाटकला पाणीप्रश्नी लवादाकडून अंतरिम दिलासा मिळेल, असा कायदेशीर सल्ला आपल्याला मिळाला आहे. 

काँग्रेस पक्षाने म्हादईप्रश्नी राजकारण करू नये, असे येडीयुरप्पा यांनी म्ह्टले असून गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. पर्रीकर यांनी येडीयुरप्पा यांना पत्र लिहून पाणी वाटपाविषयी चर्चा करण्याची तयारी आहे असे कळविल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही र्पीकर यांना पत्र लिहिले व चर्चेसाठी तारीख ठरवावी अशी विनंती केली. मात्र त्याबाबत गोवा सरकारने काही भाष्य केलेले नाही. आपण कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे र्पीकर यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र त्याविषयी येडीयुरप्पा यांनी शनिवारी कोणतेच भाष्य केले नाही.

6 फेब्रुवारीला लवादासमोर अंतिम युक्तीवाद सुरू होतील. अगोदर माङो युक्तीवाद असतील. मग कर्नाटकचे होतील. कर्नाटकने एक महिना युक्तीवाद केल्यानंतर पुन्हा मला बाजू मांडता येईल व जून किंवा जुलैमध्ये लवादाचा निवाडा येईल असे मला व्यक्तीश: वाटते.  - आत्माराम नाडकर्णी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरKarnatakकर्नाटक