शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईचे पाणी काँग्रेसच्याच राजवटीत वळवले, मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 18:45 IST

'48 तासांत मी राजीनामा द्यावा अशी मागणी करणा-या दिगंबर कामत यांनी लक्षात ठेवावे की....'

पणजी : गोव्यात दिगंबर कामत मुख्यमंत्रीपदी असतानाच कर्नाटकात तेथील सरकारी यंत्रणोने कालव्यांच्या खोदाईचे काम केले आणि त्यावेळीच म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळविण्याची प्रक्रिया सुरू झाली असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. सरकारकडे याविषयीचे पुरावेही आहेत, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 48 तासांत मी राजीनामा द्यावा अशी मागणी करणा-या दिगंबर कामत यांनी लक्षात ठेवावे की, ते स्वत: मुख्यमंत्री असतानाच म्हादईच्या कालव्यांसाठी बहुतांश खोदाई काम झाले. त्यावेळीच पाणी वळविण्याचे काम कर्नाटकने केले. आपण उगाच हे बोलत नाही तर याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. कामत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही ही वस्तुस्थिती अगोदर जाणून घ्यावी. आम्ही म्हादईप्रश्नी कोणतीच तडजोड करणार नाही. प्रसंगी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाविरुद्धही न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही न्यायालयात जाऊ देखील. कुणीच त्याविषयी संदेह मनात ठेवू नये.

सहा धरणे बांधणारम्हादई नदीचे गोव्याच्या वाटय़ाचे पाणी समुद्रात वाहून जाते असा दावा अनेकदा कर्नाटककडून केला जातो. थोडे पाणी वाहून जाणे गरजेचेच आहे पण आम्ही म्हादई नदीच्या पाण्याचा वापर करण्यासाठी सहा छोटी धरणे बांधण्याचा प्रस्ताव नव्याने विचारात घेतला आहे. आम्ही धरणे बांधण्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी जलसंसाधन मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज हेही उपस्थित होते. म्हादई पाणी तंटा लवादाचा निवाडा जोपर्यंत राजपत्रत अधिसूचित होत नाही, तोपर्यंत कर्नाटक सरकार कळसा भंडुरा प्रकल्पाचे काम सुरूच करू शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा जोर्पयत येत नाही, तोपर्यंत लवादाचा निवाडा अधिसूचितही होणार नाही. लवादाच्या निवाडय़ावर स्थगिती नाही पण आम्ही अंतरिम स्थगिती द्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करणार आहोत. म्हादईप्रश्नी पुढील कृती योजना ठरवली जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. म्हादई पाणी तंटा लवादाच्या निवाडय़ाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती द्यावी अशी विनंती गोवा सरकार न्यायालयाला करील. न्यायालयाचा निवाडा येत नाही, तोर्पयत लवादाचा निवाडा अधिसूचित होऊ शकत नाही व तो अधिसूचित होत नाही तोर्पयत कळसा भंडुराचे काम कर्नाटकला सुरूच करता येणार नाही.- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत