शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्न दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चर्चेने सोडवावा - प्रल्हाद जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 22:21 IST

कर्नाटक व गोव्यातून वाहणा-या म्हादई नदीविषयी दोन्ही राज्यांमध्ये अनेक वर्षे वाद सुरू आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्न गोवा व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मिळून चर्चेद्वारे सोडवावा, असे मत कर्नाटकमधील महत्त्वाचे नेते असलेले केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी पणजीत व्यक्त केले.

कर्नाटक व गोव्यातून वाहणा-या म्हादई नदीविषयी दोन्ही राज्यांमध्ये अनेक वर्षे वाद सुरू आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने याविषयी अलिकडेच निवाडा दिलेला आहे. याविषयी जोशी यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की लवादाच्या निवाडय़ाविषयी दोन्ही राज्ये समाधानी नाहीत. दोन्ही राज्यांना निवाडा मान्य झालेला नाही. यामुळेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून पाणीप्रश्न सोडवायला हवा. मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना व्यक्तीश: तशी विनंती करीन.

लवादाच्या निवाडय़ाचा कर्नाटक सरकार भंग करत असल्याविषयी विचारले असता, जोशी म्हणाले, की लवादाच्या निवाडय़ाचा कुणालाच भंग करता येत नाही. कुणालाच तसा अधिकारही नाही. कर्नाटकने म्हादईच्या कालव्यांचे काम सुरू ठेवलेले नाही.केंद्र सरकारने गोव्यातील सात नद्यांना राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला आहे असेही जोशी यांनी एका प्रश्नादाखल नमूद केले. कर्नाटकमध्ये कधीही गोमांस बंदी आली तरी, गोव्यावर त्याचा काही परिणाम होईल असे आपल्याला वाटत नाही असेही ते म्हणाले.

चर्चेचा प्रश्न आता कुठे ?माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे काँग्रेस हाऊसमध्ये बोलताना पत्रकारांपाशी म्हादईप्रश्नी आपली प्रतिक्रिया दिली. जेव्हा लवादाने निवाडा दिलेला आहे, तेव्हा चर्चेद्वारे वाद सोडविण्याचा प्रश्नच येत नाही. लवाद नियुक्त होण्यापूर्वी चर्चा व्हायला हवी होती. एकदा लवाद नियुक्त केला व लवादाने निवाडाही दिल्यानंतर आता चर्चा करावी या विधानाचा अर्थ काय झाला ते मला कळत नाही, असे कामत म्हणाले.

टॅग्स :goaगोवा