शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी कर्नाटकशी चर्चेस विरोध; कृती योजना लवकरच जाहीर करू - निर्मला सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 21:18 IST

म्हादई पाणी वाटपप्रश्नी कर्नाटकशी गोवा सरकारने चर्चा करण्यास आमचा विरोध आहे, असे म्हादई बचाव अभियानाने शुक्रवारी येथे स्पष्ट केले. गोवा राज्यात पाण्याची कमतरता कशी आहे ते आम्ही दाखवून देऊ.

पणजी : म्हादई पाणी वाटपप्रश्नी कर्नाटकशी गोवा सरकारने चर्चा करण्यास आमचा विरोध आहे, असे म्हादई बचाव अभियानाने शुक्रवारी येथे स्पष्ट केले. गोवा राज्यात पाण्याची कमतरता कशी आहे ते आम्ही दाखवून देऊ. आमची कृती योजना आम्ही लवकरच जाहीर करू. शुक्रवारी पहिल्या बैठकीमध्ये आम्ही कृती योजनेविषयी चर्चा करून ढोबळ रुपरेषा ठरवली आहे, असे अभियानाच्या सदस्यांनी सांगितले.म्हादई बचाव अभियानाची प्राथमिक स्वरुपाची बैठक शुक्रवारी पणजीत झाली. त्यावेळी श्रीमती सावंत यांच्यासह अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर, डॉ. नंदकुमार कामत, प्रकाश पर्येकर आदी उपस्थित होते. सुमारे तीन तास अभियानाच्या या सदस्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हादई पाणीप्रश्नी चर्चा करण्याची गोवा सरकारची तयारी असल्याचे कर्नाटकला कळविणारे पत्र दिल्यानंतर राज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याविषयी बैठकीत चर्चा झाली. गोव्यात अगोदरच पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, पुढील पिढीसाठीही पाणी राखून ठेवण्याची गोव्यावर जबाबदारी आहे अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे एका सदस्याने सांगितले. मोर्चे काढण्यासारखे आंदोलन न करता जलयात्रेचे आयोजन करणे, तहानलेला गोवा अशी परिषद भरवून गोव्यातील ज्या गावात पिण्याचे पाणी नाही अशा लोकांना संघटीत करणो तसेच म्हादईपाणीप्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेणो अशा स्वरुपाची चर्चा व निर्णय बैठकीत झाले. राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना म्हादई नदीच्या पाण्यावर चालतात. कर्नाटकला जर म्हादईचे पाणी दिले गेले तर गोव्यात जलविषयक व पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण होतील. याविषयी म्हादई बचाव अभियान जागृती करील, असे एका सदस्याने सांगितले.निर्मला सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की आमच्या डोक्यात विविध कल्पना आहेत. सध्या नाताळ सण असल्याने अनेकजण व्यस्त आहेत. तथापि, कृती योजना तयार असून आम्ही ती जाहीर करू. विविध उपक्रम आमच्या विचाराधीन आहेत. कर्नाटकशी पाणीप्रश्नी चर्चा करण्यास आमचा आक्षेप आहे. कर्नाटकविरुद्ध म्हादई बचाव अभियानाची सर्वोच्च न्यायालयात याचिका होती. कर्नाटक सरकारने त्यावेळी आपण पाणी नेण्यासाठी कालव्यांचे बांधकाम करत नाही असे न्यायालयाला सांगितले आहे. कालवेच जर बांधले नाही तर कर्नाटकला पाणी कसे नेता येईल हा देखील प्रश्न आहे. आम्ही या सगळ्य़ा विषयांबाबत लवकरच जाहीरपणो भूमिका मांडू व कृती योजनाही तयार करू.- म्हादई बचाव अभियानाच्या पहिल्या बैठकीत तीन तास चर्चा- जलयात्र काढण्याचा विचार- तहानलेला गोवा नावाने परिषद भरवून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातील लोकांना एकत्र आणणार- गोव्याचा म्हादई पाणीप्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा विचार

टॅग्स :goaगोवा