शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नास वेगळे वळण, मुख्य अभियंत्याचे पंख छाटले, हस्तक्षेप याचिका लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:02 IST

म्हादई पाणीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणि पाणी तंटा लवादासमोर येत्या आठवडय़ात हस्तक्षेप याचिका सादर होणार आहे. गोवा सरकारने या कामी म्हादई बचाव अभियानाचीही मदत घेतली आहे.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणि पाणी तंटा लवादासमोर येत्या आठवडय़ात हस्तक्षेप याचिका सादर होणार आहे. गोवा सरकारने या कामी म्हादई बचाव अभियानाचीही मदत घेतली आहे. पाणीप्रश्न पेटलेला असताना गोव्याच्या जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी हे सुट्टीवर दुबईच्या दौ:यावर गेले असल्याने सरकारने नाडकर्णी यांच्याकडील सगळे अधिकार काढून अतिरिक्त अतिरिक्त मुख्य अभियंते पी. जे. कामत यांच्याकडे सोपविण्याचे ठरविले आहे. मंत्री विनोद पालयेकर यांनी तशी सूचना जलसंसाधन खात्याच्या सचिवांना एका नोटद्वारे मंगळवारी केली.संदिप नाडकर्णी हे सद्यस्थितीत तरी विदेश जौ:यावर जाऊ नयेत असे सरकारला वाटत होते. कर्नाटकचे प्रशासन म्हादईप्रश्नी आक्रमक असताना गोव्याचे प्रशासन मात्र संथगतीने असल्याने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता कामत यांच्याकडे अधिकार सोपविले जात असल्याने म्हादईप्रश्नी लढणा:या कायदा टीमलाही ते सोयीचे ठरेल, असे सुत्रंनी सांगितले. मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी हे सुट्टीवर विदेशात गेल्याने त्यांच्यावर आता अवलंबून राहता येणार नाही, असे मंत्री पालयेकर यांनी जलसंसाधन खात्याच्या सचिवांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे.मंत्री पालयेकर यांनी मंगळवारी म्हादई बचाव अभियानाशी चर्चा केली आहे. अभियानाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात खटला जिंकलेला आहे. कर्नाटकने न्यायालयाचा अवमान केला असल्याने अभियानाकडून अवमान याचिका सादर केली जाईल. तसेच गोवा सरकारकडून इंटरलोक्युटरी अर्ज तथा हस्तक्षेप याचिका पाणी तंटा लवादासमोर सादर केला जाणार आहे. साक्षीदारांना 50 हजार कर्नाटककडून लवादासमोर जे साक्षीदार आणले जातात, त्यांना दिवसासाठी पन्नास हजार रुपयांचे शूल्क कर्नाटककडून दिले जाते. लवादासमोर उपस्थित राहण्यासाठी कर्नाटक सरकार साक्षीदारांना पन्नास हजार रुपये देते. आमचे साक्षीदार हे पैसे न घेता लवादासमोर येतात, असे मंत्री पालयेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. कर्नाटकच्या अधिका:यांनी कळसा-भंडुरा येथे प्रकल्पाचे काम करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे. आमच्याकडे छायाचित्रे आहेत व साक्षीदारही आहेत, असे पालयेकर म्हणाले. देखरेख समिती स्थापनदरम्यान, कणकुंबी येथे कर्नाटक सरकारने काम नव्याने सुरू करू नये म्हणून जलसंसाधन खात्याने आता दक्ष राहण्याचे ठरवले आहे. सरकारने मंगळवारी खात्याच्या चौघा अभियंत्यांची मिळून एक समिती नियुक्त केली आहे. अधीक्षक अभियंते एस. डी. पाटील, कार्यकारी अभियंते गोपिनाथ देसाई, सहाय्यक अभियंते दिलीप नाईक व सुरेश बाबू यांचा या समितीमध्ये समावेश आहे. दर आठवडय़ाला ही समिती कणकुंबी येथे भेट देईल व आपला अहवाल सरकारला सादर करील. जलसंसाधन सचिव पी. एस. रेड्डी यांनी तसा आदेश मंगळवारी जारी केला.

टॅग्स :goaगोवा