शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

म्हादई वॉटर राफ्टिंग येत्या २८ पासून, गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 12:08 PM

पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोेव्यात येणाऱ्या पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हादई नदीतील वॉटर राफ्टिंगचा थरार येत्या २८ पासून अनुभवता येणार आहे.

पणजी : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोेव्यात येणाऱ्या पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हादई नदीतील वॉटर राफ्टिंगचा थरार येत्या २८ पासून अनुभवता येणार आहे. सप्टेंबरपर्यंत म्हादईत वॉटर राफ्टिंग चालणार आहे. पर्यटन विकास महामंडळाने बुधवारी हे जाहीर केले.पहिली फेरी सकाळी ९.३0 वाजता आणि दुसरी फेरी दुपारी २.३0 वाजता होईल. १0 किलोमीटरचा हा थरारक प्रवास अडीच ते तीन तासांचा असेल आणि पर्यटकांना त्याचा आनंद लुटता येईल.या थरारक वॉटर राफ्टिंगच्या दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच या थरारक प्रवासाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून पर्यटकांना हे चित्रीकरण वॉटसअप किंवा गुगल ड्राइव्हवर उपलब्ध होईल. पणजीहून वाळपईपर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली असून दरडोई २00 रुपये आकारले जातील. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल म्हणाले की, हे व्हिडीओ चित्रीकरण पर्यटकांना उपलब्ध होणार असल्याने या थरारक प्रवासाच्या आठवणी हे पर्यटक स्वत:बरोबर घेऊन जातील. दहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना वॉटर राफ्टिंगमध्ये भाग घेता येईल. योग्य ती पादत्राणे तसेच व प्रवासाच्यावेळी योग्य ते कपडे परिधान करण्याची अट आहे. ५ टक्के जीएसटीसह या थरारक प्रवासासाठीचे भाडे दरडोई १८९0 रुपये एवढे आहे.पावसाळ्यात पर्यटकांसाठी हेदेखील एक मोठे आकर्षणच असते. पावसाळी साहसी उपक्रम म्हणून वॉटर राफ्टिंगकडे पाहिले जाते. वर्षा ऋतूचे दणक्यात आगमन झाले असून मन प्रसन्न करणा-या पावसात भिजण्याची आणि म्हादई खो-यातील वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्याची तसेच दाट जंगलातून, खळाळत्या नदीतल्या भोव-यांची सैर करण्याची मजा यातून लुटता येते. व्हाइट वॉटर राफ्टिंग उपक्रम आंतरराष्ट्रीय नियमांनुसार राबवला जातो. प्रशिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून हा उपक्रम सुरक्षेला प्राधान्य देत राबवला जातो. प्रत्येक प्रवाशाला तज्ज्ञांकडून माहितीपर सत्र आणि त्यानंतर लाइफ जॅकेट्स, पॅडल्स हे साहित्य दिले जाते.

टॅग्स :goaगोवा