शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई पाणीप्रश्नी निवडणुकीनंतरच कर्नाटकशी चर्चा करणार - मनोहर पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 20:11 IST

म्हादई पाणीप्रश्नी आपण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी आपण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.आल्तिनो येथे एका पायाभरणी सोहळ्य़ाला मुख्यमंत्री आले होते. पत्रकारांनी तिथे मनोहर पर्रीकर यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हादईप्रश्नी जास्त काही बोलले नाहीत. आपण येडीयुरप्पा यांना लिहिलेले पत्र तुम्हा पत्रकारांना शुक्रवारीच दिले आहे. आपण भूमिका योग्य प्रकारे पत्रातून मांडली आहे. तथापि, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका अगोदर होऊ द्या, मग आपण म्हादई पाणी वाटपाच्या कर्नाटकच्या मागणीबाबत चर्चा सुरू करीन, असे पर्रीकर यांनी नमूद केले. चर्चेसाठी तारीख ठरवली आहे काय असे पत्रकारांनी विचारले असता, कर्नाटकच्या निवडणुका झाल्यानंतरच आपण काय ते बोलेन, असा पुनरुच्चर पर्रीकर यांनी केला.

आम्ही भूमिका ठरवू : केरकरम्हादई बचाव अभियानाच्या पदाधिका-यांची शुक्रवारी पणजीत पहिली अनौपचारिक बैठक झाली. निर्मला सावंत, अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर आणि अविनाश भोसले यांनी मिळून ही बैठक घेतली व म्हादई पाणीप्रश्नी सरकारने आता अचानक घेतलेल्या नव्या भूमिकेविषयी चर्चा केली. केरकर यांनी लोकमतला सांगितले, की अभियानाची पुढील भूमिका आम्ही लवकरच ठरवणार आहोत. आम्ही पदाधिका-यांमध्ये अनौपचारिकपणो चर्चा सुरू केली आहे. डॉ. नंदकुमार कामत व अभियानाचे अन्य सदस्य मिळून आम्ही दुसरी बैठक लवकरच घेऊ. अभियानाने स्थितीवर लक्ष ठेवले असून लवकरच आमची भूमिका व पुढील कृती जाहीर केली जाईल.

जैसे थे स्थिती ठेवा : मगोपमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या मगोपनेही शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली. म्हादई पाणी प्रश्नी गोवा सरकारने सध्या जी स्थिती आहे ती कायम ठेवावी. म्हणजेच पाणी तंटा लवादाचा निवाडा होईर्पयत जैसे थे स्थिती ठेवावी. एवढी वर्षे लवादासमोर हा विषय आहे. लवादाने काय तो निर्णय घेऊ द्या. लवादाचा निवाडा आल्यानंतर मग पुढील गोष्टींचा विचार करता येईल. आता जैसे थे स्थिती ठेवणो हे गोव्याच्या हिताचे आहे, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा