मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
राष्ट्रीय आणि स्थानिक राजकारणात अभूतपूर्व ठसा उमटवणाऱ्या मनोहर पर्रीकरांच्या ७० व्या जयंतीच्या निमित्ताने आज १३ डिसेंबर रोजी त्यांचा स्मरणोत्सव साजरा करूया. ...
Goa Manohar Parrikar And Maharashtra DCM Ajit Pawar: कोण पर्रीकर? असा प्रश्न विचारल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. यातच दादा निरुत्तर झाल्याची चर्चाही रंगल्याचे म्हटले जात आहे. ...
Goa BJP State President Damu Naik Replied Maharashtra DCM Ajit Pawar: कोण पर्रीकर? या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाचे पडसाद गोव्यात उमटले आहेत. गोव्यातील भाजपा नेत्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ...