शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

म्हादईप्रश्नी लवादासमोरच निर्णय हवा : मुख्यमंत्री

By admin | Updated: August 29, 2015 02:41 IST

पणजी : म्हादई नदीतील पाण्याबाबत गोवा आणि कर्नाटक दरम्यान असलेला तंटा हा लवादाच्या बाहेर जाऊन सोडविण्याची गरज वाटत नाही;

पणजी : म्हादई नदीतील पाण्याबाबत गोवा आणि कर्नाटक दरम्यान असलेला तंटा हा लवादाच्या बाहेर जाऊन सोडविण्याची गरज वाटत नाही; कारण लवादासमोरील विषय निर्णायक टप्प्यावर आला आहे. त्यामुळे लवादासमोरच काय तो निर्णय होऊ द्या, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत म्हादई पाणी प्रश्नावर सामोपचाराने तोडगा काढण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार आहेत, असे विधान भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू व अनंत कुमार यांनी गुरुवारी केले. पार्सेकर यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्वरीत सचिवालयात पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारले. ते म्हणाले की, पंतप्रधानांची ही भूमिका आपल्यापर्यंत तरी अजून आलेली नाही. तथापि, म्हादई पाणी तंटा हा लवादासमोर असल्याने लवादाबाहेर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. लवादासमोर गोव्याची बाजू भक्कम असून तेथेच अगोदर काय तो निर्णय होऊ द्या. ते म्हणाले, की कर्नाटकचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना जाऊन भेटले, याची आपल्याला कल्पना आहे. आपण पंतप्रधानांना दिल्लीत भेटलो तेव्हा मोदी यांनी आपल्यासमोर चर्चेवेळी म्हादईचा विषय उपस्थित केला नाही. आपणही म्हादई पाणी तंट्याविषयी त्यांच्याशी काहीच बोललेलो नाही. (खास प्रतिनिधी)