शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदाचा ताबा ढवळीकरांकडे देण्यास भाजपाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:27 IST

मुख्यमंत्रीपदाचा ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्या, अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने चालवलेली असली तरी, हा ताबा मंत्री ढवळीकर यांच्याकडे देण्यास प्रदेश भाजपा व राष्ट्रीय भाजपाही तयार नाही अशी माहिती मिळाली.

ठळक मुद्दे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्या, अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने चालवलेली असली तरी, हा ताबा मंत्री ढवळीकर यांच्याकडे देण्यास प्रदेश भाजपा व राष्ट्रीय भाजपाही तयार नाहीभाजपाने आपला नकार मगोपला अप्रत्यक्षरित्या विविध प्रकारे कळविला असल्याचे सुत्रांनी सांगितले.पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा ढवळीकरांकडे द्यावा, अशी भूमिका भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मांडली.

पणजी - मुख्यमंत्रीपदाचा ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्या, अशी मागणी मगोपच्या केंद्रीय समितीने चालवलेली असली तरी, हा ताबा मंत्री ढवळीकर यांच्याकडे देण्यास प्रदेश भाजपा व राष्ट्रीय भाजपाही तयार नाही अशी माहिती मिळाली. भाजपाने आपला नकार मगोपला अप्रत्यक्षरित्या विविध प्रकारे कळविला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी आहेत व ते सचिवालयात येऊ शकत नसले तरी, लोकसभा निवडणुकांपर्यंत पर्रीकर यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा असावी असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्तरावर ठरलेले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मंत्री विश्वजित राणे, आमदार प्रमोद सावंत आदी अनेकजण इच्छुक आहेत पण पर्रीकर हे घराकडूनच थोडे तरी काम करत असल्याने त्यांच्याकडील मुख्यमंत्रीपद हे काढून घेतले जाणार नाही. तथापि, बहुतेक खाती पर्रीकर यांच्याकडेच आहे व सध्या प्रशासन पूर्ण ठप्प झालेले आहे अशी टीका सरकारमधील मंत्री जाहीरपणे करत आहेत. माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी तर निषेध म्हणून सचिवालयात जाणेच बंद केले आहे. गेले दहा दिवस ते सचिवालय तथा मंत्रालयात गेलेले नाहीत. त्यांनी मात्र मंत्री ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा द्यावा असे म्हटलेले नाही.

मंत्री ढवळीकर हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ आहेत. त्यामुळे पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा ढवळीकरांकडे द्यावा, अशी भूमिका भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनीही नुकतीच मांडली. दुसऱ्या बाजूने मगोपच्या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी तसेच कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनीही ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सोपवावा अशी मागणी केली. मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनीही तशीच मागणी केली आहे. मात्र मंत्री ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा सोपविणो कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनाही मान्य नाही. पर्रीकर यांनीच मुख्यमंत्रीपदी रहावे पण ताबा तेवढा ढवळीकरांकडे द्यावा ही मागणी मान्य होत नसल्याने मगोपने आता ताठर भूमिका घेत थेट भाजपाच्या दोन नेत्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर