शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 11:05 IST

गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यात यापुढे होणाऱ्या विधानसभेच्या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुका हा कळीचा मुद्दा बनला आहे.

पणजी : गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यात यापुढे होणाऱ्या विधानसभेच्या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुका हा कळीचा मुद्दा बनला आहे. भाजपा आणि मगो या दोन्ही पक्षांमध्ये या पोटनिवडणुकांच्या विषयावरून मोठा संघर्ष सुरू झाला आहे.

गेल्या 16 ऑक्टोबर रोजी भाजपाने काँग्रेसच्या दोन आमदारांना राजीनामे देण्यास भाग पाडले व त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला. दोन्ही माजी आमदार शिरोडा व मांद्रे या दोन विधानसभा मतदारसंघांमधून भाजपाच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवणार आहेत. माजी मंत्री दिपक ढवळीकर हे मगोपचे अध्यक्ष आहेत. मगोपचे दोन आमदार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. या शिवाय मगोपचे एक आमदार सरकारी महामंडळाचे चेअरमन आहेत. मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांना मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने शिरोडा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध मगोप शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांमध्ये लढणार आहे. यापैकी शिरोडामध्ये मगोपचे उमेदवार ढवळीकर यांनी प्रचारही सुरू केला. त्यांनी नुकताच मोठा महिला मेळावाही घेतला. आपण सरकारविरुद्ध नाही, सरकार पडावे असे मला वाटत नाही पण फुटीरांना धडा शिकवायला हवा असा विचार करून आपण रिंगणात उतरत आहे, असे ढवळीकर यांनी जाहीर केले. मगोपच्या या भूमिकेमुळे पर्रीकर सरकारमधील दुसरा एक घटक पक्ष गोवा फॉरवर्डही आश्चर्यचकित झाला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी लोकमतला सांगितले, की भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मगोपच्या नेतृत्वाशी चर्चा करील. पोटनिवडणुकीवेळी मगोपने उमेदवार उभा करू नये अशी विनंती करील. भाजपाचे मगोपशी संबंध ताणले गेलेले नाहीत. दरम्यान, मगोपने दबावाचे राजकारण न करता हिंमत असल्यास सरकारमधून बाहेर जावे, सरकार पडत असेल तर पडो द्या अशी प्रतिक्रिया नुकतीच पर्रीकर मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण