शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ पूर्ण होण्यासाठी मे महिन्यांपर्यंत अवकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 19:20 IST

आतापर्यंत चार वेळा उद्घाटनाचा मुहूर्त हुकलेल्या मडगावातील नव्या दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या उद्घाटनाचा आणखी एक मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.

मडगाव: आतापर्यंत चार वेळा उद्घाटनाचा मुहूर्त हुकलेल्या मडगावातील नव्या दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या उद्घाटनाचा आणखी एक मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे इस्पितळ बांधून पूर्ण करून प्रजासत्ताक दिनी त्याचे उद्घाटन होणार अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कशाही रितीने डिसेंबर 2018 पर्यंत हे काम पूर्ण करू, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी काही बदल सुचविल्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच महिने जावे लागणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत एप्रिल - मे महिन्यापर्यंत या प्रकल्पाचे पूर्ण होईल, अशी माहिती गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर यांनी दिली.या इस्पितळाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्यापर्यंत उरलेले दहा टक्के काम पूर्ण करून आम्ही हा प्रकल्प आरोग्य खात्याकडे सुपूर्द करू, असे पाऊसकर यांनी सांगितले. या इस्पितळात अद्याप एका ऑपरेशन थिएटरचे आणि वैद्यकीय गॅस पुरवठा यंत्रणा बसविण्याचे काम बाकी राहिलेले आहे. या इस्पितळात एकूण 9 ऑपरेशन्स थिएटर्स असतील. दक्षिण गोव्यातील सहा तालुक्यासाठी या जिल्हा इस्पितळाचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्थानिक आमदार असलेले नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सल्लामसलत करून लवकरच कामाला गती आणली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांनी दिली. मडगावातील हॉस्पिसियो हे जिल्हा इस्पितळ अगदी जीर्ण अवस्थेत चालू असल्याने लवकरात लवकर हे नवीन इस्पितळ सुरू व्हावे, अशी जिल्ह्यातील सर्व लोकांची मागणी आहे.