शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या धक्क्याची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 11:08 IST

पर्रीकरांचा निर्णय गोव्यात फार चर्चेचा विषय ठरण्यामागे सध्या एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी आहे. उच्चवर्णीय विरूद्ध बहुजन असे टोक या वादाने गोव्यात गाठले.

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका फटक्यात शुक्रवारी कोकणी साहित्य आणि भाषा सेवेसाठीचे एकूण 32 पुरस्कार रद्द केल्यानंतर नेटीझन्सनी सोशल मिडियावर तो मोठ्या चर्चेचा विषय बनवला आहे. गोव्यातील कोंकणी आणि मराठीप्रेमींमध्ये तर उलटसुलट प्रतिक्रीयांची मोठी लाट आली आहे.

पर्रीकरांचा निर्णय गोव्यात फार चर्चेचा विषय ठरण्यामागे सध्या एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी आहे. उच्चवर्णीय विरूद्ध बहुजन असे टोक या वादाने गोव्यात गाठले. गोव्यासह महाराष्ट्रात परिचित असलेले साहित्यिक विष्णू वाघ यांनी कोंकणीत सुदिरसुक्त हा कवितासंग्रह लिहिला. या कवितासंग्रहाला कोकणी अकादमीने पुरस्कार देणे निश्चित केले होते. उच्चवर्णीयांविरुद्ध आसूड ओढले गेले आहेत असा आक्षेप घेऊन काही कोकणी लेखक तसेच अन्य कोकणीप्रेमीनी याविरुद्ध चळवळ सुरू केली. सगळीकडून व विशेषत: सोशल मिडियावरून टीका सुरू झाली. मात्र वाघ यांचे चाहते असलेल्या  मराठीप्रेमींनी वाघ यांना पुरस्कार मिळायला हवा अशी भूमिका घेतली. यात देवीदास आमोणकर, रोहिदास शिरोडकर, प्रदीप घाडी आमोणकर आदींचा समावेश आहे. कोकणी अकादमीने वाघ यांच्या पुस्तकासह एकूण 32 पुस्तकांना पुरस्कार देणे निश्चित केले होते. मुख्यमंत्र्यांनी वाघ यांचा पुरस्कार रद्द करण्याच्या प्रयत्नात सर्व 32 पुरस्कार रद्द केले. यामुळे कोकणी व मराठीप्रेमींमधील नेटीझन्सनी सोशल मिडियावरून पुन्हा सरकारवर टीका सुरू केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी फक्त वाघ यांचा पुरस्कार रद्द करायला हवा होता पण त्यानी सगळेच पुरस्कार रद्द केले हे कोकणी साहित्य व संस्कृतीच्यादृष्टीने चांगले घडले नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कवी व विचारवंत उदय भेंब्रे यानी व्यक्त केली आहे. सर्व पुरस्कार रद्द करणे हे धक्कादायक आहे असे कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य यांनी लोकमतला सांगितले. कोकणी कवी परेश कामत यांनी मात्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले. पुरस्कारांची सारी निवड प्रक्रिया सदोष होती व त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकरांनी केले ते ठीकच असे देखील मत काहीजण व्यक्त करत आहेत.....

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाSocial Mediaसोशल मीडिया