शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाट्य दिग्दर्शक विजयकुमार नाईक यांचे अल्पशा आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 17:10 IST

नाट्य क्षेत्रात भरघोस योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी व हंस नाट्य ट्रेनिंग सेंटरचे मुख्य आधारस्तंभ विजयकुमार नाईक यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

फोंडा : बालनाट्य चळवळ व युवा नाट्य चळवळ अशा माध्यमातून नाट्य क्षेत्रात भरघोस योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी व हंस नाट्य ट्रेनिंग सेंटरचे मुख्य आधारस्तंभ विजयकुमार नाईक यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. फोंडा येथील स्मशानभूमीत संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २००३ मध्ये झालेल्या युवा मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर २००५ मध्ये झालेल्या गोमंतक मराठी नाट्य संमेलनाचेसुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. 

विजयकुमार नाईक यांनी हंस थिएटर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून सुमारे १५० बालनाट्य कार्यशाळा, युवा वर्गासाठी १०० कार्यशाळा, खास मुलांसाठी कार्यशाळा त्यांनी घेतल्या. गोव्यातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात नाटक शिकवण्यासाठी त्यांनी भ्रमंती केली. देशभरातील नाट्य विषयक संमेलने, परिषदांना ते उपस्थित असायचे. त्यामुळे देशभरात त्यांचा चाहता वर्ग होता. शास्त्रोक्त पद्धतीने नाट्य विषयावरील पेपर सादरीकरण करणे ही त्यांची हातोटी होती. संहिता, दिग्दर्शन, प्रकाश योजना, वेशभूषा, ध्वनी संकलन, नेपथ्य अशा नाटकाच्या प्रत्येक विभागात त्यानी अमूल्य योगदान दिले आहे. नाईक यांनी विपूल लेखन केले आहे. आजवर त्यांनी २१ एकांकिका, २६ नाटके, १३ बालनाट्य, ५ एकल नाटक, १३ संवाद विरहित नाट्य व पाच नभोनाट्य लिहिली. त्यांच्या षटकोन व मुखवटे या दोन पुस्तकांना चार पुरस्कार मिळाले आहेत.

देशभरातील विविध संस्थांकडून त्यांचा गौरव झाला. राजस्थानचा निर्मोही नाट्य सन्मान, सोलापूरचा रंगसाधक पुरस्कार, मुंबईचा रंगकर्मी व वसंत सोमण पुरस्कार, पुणे चा प्रयोगकर्मी व रंगमेळ पुरस्कार, गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता. नाईक यांनी गोवा आणि देशभरात १६३ नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांचे दीड हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. विजयकुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर हा नाट्य क्षेत्रात त्यांनी अनोखा प्रयोग केला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोवा व महाराष्ट्रातून अनेक नाट्यकलकरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :goaगोवा