शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी धरणातून पाणी सोडल्याने गोव्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:01 IST

शेकडो लोकांना हलवले : रात्री आठच्या सुमारास घरांत शिरले पाणी, वीज खंडित, लोक भयभीत

पणजी - महाराष्ट्र व गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून  पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरु असल्याने गोव्यातील डिचोली तालुक्यांतील गावांना पुराचा तडाखा बसलेला आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. वीज ट्रान्सफार्मरच पाण्याखाली गेल्याने विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. लोकांचे हाल सुरु झालेले आहेत.

डिचोली तालुक्यातील साळ ( लोकसंख्या 2000) मेणकुरे (1800), नानोडा (1000) आमोणे (4500)  आदी गावांना पुराचा तडाखा बसला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर आदींनी या गांवाना भेट देऊन पूगस्त लोकांना दिलासा दिला. घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

धरणातूनपूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यामुळे सालसह अनेक  गावांना पुराने वेढलेले आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरांमध्ये पाणी शिरू लागल्याने लोक घाबरले आणि सुरक्षितस्थळी आसरा शोधू लागले. रात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, खंडित वीज आणि घरांत शिरणारे पाणी यामुळे लोक संतप्त आणि भयभीत झालेले होते. भूमिका मंदिर परिसरातील सखल भागात सुमारे 100 हून अधिक जणांना रात्री उशिरा बोट व इतर माध्यमांचा वापर जारून पंचयात सभागृहात हलविण्यात आले आहे .

पातळी 43.30 मीटर तिलारी धरणाची धोक्याची पातळी 43.60 मीटर आहे. सध्या ही पातळी 43.30 मीटर झाल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला असून डाव्या कालव्याद्वारे धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडण्यात येत आहे. बुधवारी धरणाचा चौथा दरवाजा उघडून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला व नदीपात्रातील संरक्षक भिंत ओलांडून पाणी घोटगेवाडी गावातील सखल भागात घुसले.

टॅग्स :floodपूरgoaगोवाDamधरण