शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

 मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून मानले हितचिंतकांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 18:07 IST

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले.

पणजी - गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्याआधी पर्रिकर यांनी आजारपणात प्रकृतीच्या सुधारणेसाठी सदिच्छा देणाऱ्या हितचिंतकांचे ट्विटरवरून आभार मानले. "आजारी पडल्यानंतर माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा देणाऱ्या, तसेच मंदिर, चर्च आणि मशिदींमधून प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंकांचे मी आभार मानतो. मी तुमच्या प्रेमामुळे भारावून गेलो आहे. तुमच्या सदिच्छा,शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळेच आजारपणातून लवकरात लवकर सावरून गोव्यात परतणे मला शक्य झाले आहे."  असे पर्रिकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज कोणत्याही परिस्थीतीत स्वत:च राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केल्याने ते गोव्याला यायला निघाले. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विशेष विमानाने मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री पर्रिकर गेल्या आठ दिवसापासून मुंबईच्या लिलावती इस्पितळात पचनक्रियेतील बिघाडावर उपचार घेत आहेत. विधानसभेच्या सोमवार पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पर्रिकर उपस्थित राहू शकले नव्हते. पर्रिकर दुपारच्या विमानाने गोव्यात उतरत असून दुपारी अडीच वाजता विधानसभेत दाखल होऊन ते अर्थसंकल्प सादर करतील. त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत, असा सल्ला त्यांना तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करुन ते तातडीने मुंबईला परततील अशी शक्यता आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाGovernmentसरकार