शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री गोव्यात दाखल, सत्ताधारी आघाडी स्थिर : मंत्री खंवटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 19:48 IST

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचार घेऊन अमेरिकेहून गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री दाखल होताच नेतृत्व बदलाच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला. विद्यमान सत्ताधारी आघाडी स्थिर आहे, अशा अर्थाची विधाने गुरुवारी सायंकाळी विविध मंत्र्यांनी केली.सरकारमध्ये दोन अपक्ष मंत्री आहेत. सरकार स्थिर ठेवण्यासाठी त्यांचा पाठींबाही खूप महत्त्वाचा आहे. अपक्ष मंत्री ...

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचार घेऊन अमेरिकेहून गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री दाखल होताच नेतृत्व बदलाच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला. विद्यमान सत्ताधारी आघाडी स्थिर आहे, अशा अर्थाची विधाने गुरुवारी सायंकाळी विविध मंत्र्यांनी केली.

सरकारमध्ये दोन अपक्ष मंत्री आहेत. सरकार स्थिर ठेवण्यासाठी त्यांचा पाठींबाही खूप महत्त्वाचा आहे. अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी पर्वरी येथील एका सोहळ्य़ावेळी सरकार स्थिर असल्याचे सांगितले. विद्यमान सत्ताधारी आघाडी एकदम स्थिर असून गेल्या सोळा महिन्यांमध्ये अनेक कामे सरकारने केली. पूर्वी ज्या झाल्या नव्हत्या, त्या अनेक गोष्टी आता झालेल्या पहायला मिळतात. महसूल व भू-विषयक सुधारणा, माहिती तंत्रज्ञान धोरण, उद्योग धोरण व अन्य अनेक गोष्टी गेल्या सोळा महिन्यांत झाल्या, असे मंत्री खंवटे म्हणाले.

पर्रिकर गेल्या आठवडय़ात पुन्हा अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्री पर्रिकर हे 8 सप्टेंबर रोजी गोव्यात येणार होते. मात्र ते दोन दिवस अगोदरच अमेरिकेहून गोव्यात पोहचले. पर्रिकर सायंकाळी दाबोळी विमानतळावर पोहचल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. पर्रिकर यांच्या अमेरिकेत विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्याविषयीचा अहवाल चांगला असल्याची चर्चा अन्य मंत्र्यांमध्ये सुरू आहे. सरकारमध्ये नेतृत्व बदल होत असल्याच्या व भाजपचे तसेच काँग्रेसचेही प्रत्येकी तीन आमदार फुटत असल्याच्या चर्चा व अफवा गेल्या काही दिवसांत रंगल्या. अफवांनी गोवा ढवळून निघाला होता. तथापि, मगोप व गोवा फॉरवर्ड हे दोन्ही घटक पक्ष आणि अपक्षही पर्रिकर यांच्याच नेतृत्वासोबत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये परतणार असल्याची अफवा जास्त चर्चेत आली. सरकार पडण्याच्या अफवांमुळेच पर्रिकर अमेरिकेहून दोन दिवस अगोदरच गोव्यात दाखल झाल्याचे काँग्रेसच्या काही आमदारांकडून मानले जात आहे. पण ते खरे नव्हे, असे भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाState Governmentराज्य सरकारBJPभाजपा