शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आईविषयी जागवलेल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 00:59 IST

मनोहर पर्रीकर यांच्या जडणघडणीत त्यांची आई राधाबाई यांची मोठी भूमिका राहिली आहे. स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे ही त्यांची कळकळ होती. त्यासाठी सतत मुलांच्या मागे अभ्यासासाठी त्या रेटा लावायच्या. एकपाठी असणाऱ्या मला पुस्तक घेऊन अभ्यास करणे जमलेच नाही. त्यासाठी बरेचदा आईच्या हातचा मारही खावा लागला... आपल्या आईचे व्यक्तिमत्त्व रेखाटले आहे खुद्द मनोहर पर्रीकर यांनीच...

- मनोहर पर्रीकरराजभवनाचा प्रशस्त हॉल... गदीनं तुडुंब भरलेला... ओळखीचे अनेक चेहरे... सगळ््यांच्या चेहऱ्यांवर उत्साह, आनंदाचं उधाण आलेलं... या साºयाला निमित्त होतं, गोवा राज्याचा मी मुख्यमंत्री बनण्याचं, शपथविधी सोहळ््याचं. ज्यांच्याबरोबर मी राजकारणात प्रवेश केला ते माझे सहकारी, माझे हितचिंतक, पक्षातील सर्व स्तरावरचे कार्यकर्ते यांच्याबरोबर मला त्या गर्दीत माझी दोन मुलं, बहीण-भावंडं दिसत होती. तरी हे चित्र अपुरं होतं. राहून-राहून आठवण येत होती ती आई-वडील आणि बायको मेधाची!नियतीचा खेळ किती अजब! एका वर्षात टप्प्याटप्प्यानं माझ्या जवळची ही माणसं माझ्यापासून कायमची दूर गेली. ज्यांच्या असण्यानं मला बळ मिळत होतं, प्रेरणा मिळत होती, अशा माझ्या ‘आप्त-स्वकियांची’ उणीव भरून काढू शकत नव्हतं. समारंभाला जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाकडे बघून मी स्वत:ला सावरलं.गोव्यामध्ये ‘भारतीय जनता पक्षा’चं काम वाढावं, अधिक विस्तारावं म्हणून संघाच्या चार स्वयंसेवकांना पक्षाचे पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये मी, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि राजेंद्र आर्लेकर या चार जणांनी पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली. घरात ‘संघाचं’ वातावरण होतं. ‘संघ’ विचारांचा प्रभाव होता. मी राजकारणात जाईन असं आमच्या घरातल्यांना कधी वाटलं नव्हतं. विशेषत: आईची प्रतिक्रिया महत्त्वाची होती. ‘राजकारणात राहूनही चांगलं काम करता येऊ शकतं’ यावर तिचा विश्वास होता. आमच्या घराचा, घराण्याचा राजकारणाशी कधीही संबंध आला नाही. कदाचित आईनं माझ्यासाठी काही वेगळी स्वप्नं बघितली असतील. वेगळ््या अपेक्षा ठेवल्या असतील; पण आईच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ‘चांगला माणूस’ बनणं.आमच्या कुटुंबासाठी आईच सर्वकाही होती. वडील तसे शांत स्वभावाचे, त्यांच्याच कामात व्यस्त असणारे. वडिलांचं दुकान होतं. त्यामुळे वडिलांचा जनसंपर्क अफाट होता. घरातल्या सर्व प्रकारच्या निर्णयात आईचा नुसता सहभाग नाही तर तिचाच अंतिम निर्णय असायचा. घरात आम्ही पाच मुलं. दोन बहिणी, दोन भाऊ आणि मी. भावंडांमध्ये माझा चौथा नंबर. आम्हा सर्वांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आईनं भरपूर प्रयत्न केले. ती स्वत: पाचवीपर्यंत शिकलेली. तिला लिहिता-वाचता यायचं. त्यामुळे आमच्यााडून अभ्यास करून घेण्याचं काम तिच्याकडे असायचं.आईचं नाव ‘राधाबाई’ आणि वडिलांचे ‘गोपाळकृष्ण.’ आईला सर्वजण ‘ताईबाय’ म्हणायचे. सगळ््या पर्रीकर परिवारात तिला मान होता. अर्थात तो तिनं तिच्या वृत्तीनं, स्वभावानं मिळवला. तिला सर्व प्रकारच्या कामांचा अनुभव असल्यामुळे पर्रीकर कुटुंबात तिला विचारून सगळं केलं जायचं. शिवाय ती ‘सुगरण’ होती. एखादा साधासा पदार्थ जरी तिनं बनवला, तरी त्याला खूप छान चव असायची. ‘तुझ्या हातात काय जादू आहे की काय?’ असेच तिला सर्वजण म्हणायचो.लहानपणी मी दंगामस्ती करायचो. अभ्यासावरून मी आईचा खूप मार खाल्ला. आम्हा सर्व भावंडांना ती एकत्र अभ्यासाला बसवायची. माझं अर्ध लक्ष बाहेर असायचं. माझी चुळबूळ चालायची. आई मार द्यायची. अभ्यास केला नाही म्हणून तिनं मला एकदा घराबाहेर उभं केलं होतं. आईकडून सगळ््या प्रकारच्या शिक्षा मला मिळाल्यामुंबईत आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी थोडे दिवस तिथंच नोकरी करत होतो. ती नोकरी सोडत असतानाच मी मेधाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आईचा पाठिंबा होताच. ‘तू निर्णय घेतला आहेस म्हणजे नक्कीच काही न्् काही विचार केला असशीलच.’ असं म्हणून ती माझ्यामागे उभी राहिली. आमचं लग्न मुंबईतच झालं. मग मी गोव्यात परत आलो. माझं लग्न हा देखील माझ्या मित्रांना आश्चर्याचा धक्का होता.माझ्या कामाला आईनं नुसतं प्रोत्साहन दिलं नाही, तर स्वत:ही ती त्यामध्ये सहभागी व्हायची. मी राजकारणात जाईन असं तिला कधीच वाटलं नव्हतं. पण माझ्यावर मोठ्या विश्वासानं वरिष्ठांनी जबाबदारी दिलीय म्हटल्यावर घरातली मोठी समर्थक म्हणून ती माझ्या बाजूनं होती. १९९४ ला मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. माझ्यासाठी पणजी मतदारसंघ निवडण्यात आला होता. आईला पहिल्यापासून विश्वास होता, की ही निवडणूक मीच जिंकणार. तिची स्वत:ची गणितं ठरलेली असायची. माझ्या प्रचाराला आई-वडील, मेधा आणि घरातले सगळेजणच उतरले आणि मी निवडणूक जिंकलो. इतके दिवस विरोधकांकडे असणारा मतदारसंघ आमच्या ताब्यात आला.‘समस्या काही सांगून येत नाहीत; पण जेव्हा येतील तेव्हा आपण कणखर असलो पाहिजे’ असं आई सांगायची. माझ्या कणखरपणाची परीक्षाच देव बघत होता असं वाटू लागलं. राजकारणात नव्यानं आलेल्या जबाबदाºया पार पाडण्यात व्यस्त असताना अचानक एक दिवस वडिलांचं हृदयविकारानं निधन झालं. आमच्या घराचा पहिला ‘कणा’ निखळला. घरातला एक ‘समंजस आधार’ तुटला... तेव्हा कळून चुकलं की आईचं ‘असणं’ हे सर्वस्वी बाबांवर अवलंबून होतं. बाबांच्या जाण्यानं ती आतून तुटली, कोलमडली होती. खूप बोलणारी माझी आई एकदम ‘शांत’ झाली होती. ती काही बोलत नव्हती. तिनं कधी बोलून दाखवलं नव्हतं; पण बाबा तिच्यासाठी किती महत्त्वाचे होते हे आम्हाला कळून चुकलं.घरात बाबांच्या ‘बाराव्या’ची तयारी सुरू होती. सकाळी लवकर माझे जवळचे मित्र आणि नातेवाईक घरात जमले होते. आईला मी म्हापशातच राहणाºया माझ्या मोठ्या भावाच्या घरी पाठवलं होतं. सकाळी लवकर भावाचा फोन आला. काहीतरी निरोप असणार असं वाटून गेलं. फोनवर बराच वेळ शांतता होती. तो बोलतच नव्हता. मग कसाबसा आवाज आला. ‘आई गेली रे...’ असं तो म्हणाला.माझ्या ध्यानीमनी असा वाईट विचार आलाच नाही. आज बाबांचा बारावा आणि आई कुठे गेली असंच वाटून गेलं. त्यामुळे साहजिकच- ‘कुठे गेली आई?’ असं माझ्या तोडून आलं.‘आपल्याला सोडून गेली... सकाळी तिला उठवायला गेलो तर तिचं झोपेतच निधन झालं होतं.’हे सगळं मी काय ऐकत होतो? कोणते शब्द माझ्या कानावर पडत होते, काही कळत नव्हतं. वडिलांच्या निधनाचं दु:ख संपलं नसताना आईच्या निधनाची ही घटना मला हादरून सोडणारी होती. आम्ही एकदम पोरके झालो. आई-वडील दोघांचा आधार तुटला. वडिलांचा बारावा आणि आईचे अंत्यसंस्कार एकाच दिवशी करावे लागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाबांचं जाणं आई पचवू शकली नाही. आमचा आधार, आम्हाला कणखर बनवणारी माउली स्वत:च खचून गेली. तिचं बाबांवर एवढं प्रेम होतं की त्यांचा ‘वियोग’ ती सहन करू शकली नाही.एकामागे एक संकटांची मालिका सुरू झाली. राजकीय जीवनात मी यशाची एकेक पायरी चढत होतो आणि माझ्याबरोबर असणारे ‘माझे’ सगळे एकेक करून माझ्यापासून दूर जात होते. आईविना पोरका झालेलो मी दु:खात होतो. तीच वेळ माझ्या मुलांवर आली. आमची दु:खं समान पातळीवर येऊन पोहचली. घरात कोणी कुणाला आधार द्यायचा हेच उमगत नव्हतं. आईच्या शिकवणीची शिदोरी तेवढी बरोबर होती.२००० सालच्या विधानसभा जवळ आल्या. प्रचाराला सुरुवात झाली. या सगळ््या पार्श्वभूमीवर आमच्या घरात एकदम शांतता होती. मागील निवडणुकीतल्या वेळेला माझ्याबरोबर असणाºया, आवश्यक सूचना, मार्गदर्शन करणा-या माझ्या सर्वात जवळच्या व्यक्ती या वेळेला माझ्याबरोबर नाहीत याची जाणीव सोबत घखेउनच मी ही निवडणूक लढलो.(‘समदा’च्या २00८ सालच्या दिवाळी अंकातील ‘आई होती म्हणुनी’ या विषयावरील लेखातून साभार, मनोहर पर्रीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने हा लेख प्रसिद्ध केला. आज पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत.   )

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा