शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

आठवणीतील अमूल्य ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 00:53 IST

देशातील पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. गोव्याच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, विविध लोकोपयोगी योजना यशस्वीपणे राबविणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे राजकारणातील ‘अपवाद’ म्हणावा असे आहेत. असे बुद्धीमान व्यक्तिमत्त्व लिहितेय आपल्या शाळेतील दिवसांबद्दल...

- मनोहर पर्रीकरशाळेबद्दलच्या आठवणी मनात येत असताना साहजिकपणे सर्वात प्रथम मनात येतात ते शाळेतील गुरूजन आणि मित्रमंडळी. त्यांच्याशिवाय शाळेबद्दलच्या आठवणी पूर्ण होणारच नाहीत. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पाया हा शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना घातला जातो असं मला वाटतं. त्या वेळेला लाभलेले शिक्षक, प्राध्यापकवर्ग, त्यांची शिकवण यांचा खूप मोठा प्रभाव आणि परिणाम त्या वयात मनावर होत असतो. आजही बघा, शाळेत जाणाऱ्या मुलाला आपले शिक्षक जे काही सांगतात तेच खरं असं वाटत असतं. तुम्ही त्याला काही सांगायला गेलात तर आमच्या शिक्षकांनी असं नाही सांगितलं, असं तो तुम्हाला ऐकवत असतो. माझ्या आयुष्यात मलाही अशी चांगली शाळा आणि चांगले शिक्षक लाभले, ज्यांचा माझ्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे.माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावामधील म्हणजे पर्रामधील सरकारी प्राथमिक विद्यालयात झालं. ही मराठी माध्यमातील शाळा होती. त्यामुळे पहिली ते पाचवीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं. पुढे मी म्हापशातील सरस्वती विद्यालयात शिकायला गेलो. सहावीपासून इंग्रजी माध्यम सुरू झालं. शाळेत बहुतेक सगळे चांगले शिक्षक होते, पण त्यात काही ज्यांना उत्कृष्ट म्हणता येतील असेही शिक्षक होते. सुखटणकर सर जे आम्हाला विज्ञान शिकवायचे, सिरसाट सर जे आम्हाला गणित शिकवायचे त्यांना मी कधी विसरू शकत नाही. साध्यासोप्या पद्धतीने ते आम्हाला शिकवत असत. यामध्ये प्राचार्य सुरेश आमोणकर यांना विसरता येणार नाही. आमोणकर सर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं भूगोल आणि इंग्रजी विषय शिकवायचे. त्यांच्यामुळे मला भूगोल विषयाची आवड निर्माण झाली. इंग्रजीमध्ये मला खूप चांगले मार्क पडायचे नाहीत, पण सरासरी मार्क पडायचे. आमोणकर सर इंग्रजी खूप चांगलं शिकवायचे. सरांच्या इंग्रजी शिकवण्यामुळे दहावीला इंग्रजीमध्ये चांगले मार्क पडले. त्यांचं शिकवणं मनापासून असायचं.शाळेत माझे कायम गणित आणि विज्ञान हे विषय आवडते होते. नंतर भौतिकशास्त्र -रसायनशास्त्र हेही विषयक आवडीचे झाले. पाचवीनंतर भाषा या विषयात आम्हाला फ्रेंच हाही विषय होता. हा विषय मला अगदी संकट वाटायचा. कशाला फ्रेंच विषय आपण शिकतोय असं वाटायचं. पूर्ण शालेय जीवनात मला वह्या पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसावं लागलंय, घोकंपट्टी केलीय, अभ्यासाचं खूप टेन्शन आलंय असं कधीच झालं नाही. मला फक्त फ्रेंच विषयाचा अभ्यास करावा लागायचा तो तेवढाच. वर्गात शिकवलेलं माझ्या पक्कं लक्षात राहायचं. मी एकपाठी होतो. आईला कधी कधी काळजी वाटायची. पण तिलाही जेव्हा माझ्यातला हा गुण लक्षात आला तेव्हापासून ती देखील अभ्यासाबाबत फारशी ओरडली नाही. मी कधी शाळेत शिक्षकांकडून अभ्यासासाठी मार खाल्ला नाही आणि कधी घरातूनही मार खाण्याची वेळ आली नाही. मला आठवतंय, एका वर्षी माझ्यापेक्षा फार नाही, पण थोडे जास्त मार्क माझ्या नात्यातल्याच एका मुलाला मिळाले होते. ते आईला समजलं, त्या वेळेस फक्त आईनं मला चांगलं झोडलं होतं, पण तेही अभ्यास करीत नाही म्हणून नाही तर त्याच्यापेक्षा मार्क कमी पडले म्हणून. कदाचित तिचा इगो दुखावला गेला असेल. पण त्यानंतर मी आईचा कधी मार खाल्ला नाही. परीक्षेच्या निकालात पहिल्या आठ नंबरमध्ये माझा कायम नंबर असायचा. आणि त्यातही विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यामध्ये नव्वदच्या वर मार्कस् असायचे.शाळेत असताना मी एका गोष्टीत अजिबात भाग घेतला नाही आणि तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम-उपक्रम. माझ्या स्वभावात ते बसत नव्हतं. तोंडाला रंग लावणं, भलीमोठी वाक्य पाठ करणं आणि एक आविर्भाव आणून सर्वांसमोर म्हणणं मला कधी जमलं नाही. मला त्याचा आस्वाद आवडतो. आजही मी मराठी भावगीतं, नाट्यसंगीत प्रवासात वेळ मिळेल तेव्हा ऐकतो. पण मी स्वत: या सगळ्या गोष्टी करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मी शाळेत खेळांमध्ये जास्त रमायचो. खेळांचे संस्कार संघ शाखेमुळे झाले. खेळांच्या बाबत म्हणाल तर फुटबॉल आणि क्रिकेट हे माझे आवडते खेळ. त्यातही फुटबॉल हा माझा जास्त आवडता खेळ. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेमध्येही बऱ्याच वेळा भाग घेतला होता. आजही फुटबॉलची मॅच लागली आणि मला वेळ असेल तर नक्की बघतो. त्या वयात मुलं ज्या पद्धतीची मजा करातात तशी मजा आम्हीही केली. शाळेच्या बाहेर आम्ही मजा करायचो. आंबे, बोरं, आवळे तोडणं हा आमचा आवडता उद्योग होता. हे कामही आम्ही नियोजनपूर्वक करायचो.शाळेत असताना आमची मित्रांची एक गॅँग होती. मस्ती करायचो पण सगळे संग शाखेत जाणारे असल्यामुळे विधायक कामांकडे जास्त ओढा होता. संजय वालावलकर, दिलीप महाले, मनगलाल मराठे आणि लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माझा भाऊ अशी आमची गॅँग होती. लक्ष्मीकांत पार्सेकर माझ्या भावाच्या वर्गात होते. पण आमचा ग्रुप मात्र एकच होता. शाळेत दंगामस्ती केल्याचं कधी आठवत नाही, पण शाळेच्या बाहेर आम्ही मजा करायचो. आंबे, बोरं, आवळे तोडणं हा आमचा आवडता उद्योग होता. हे कामही आम्ही नियोजनपूर्वक करायचो. म्हणजे सर्वात आधी आंबे, बोरं आवळे लागलेली झाडं शोधून ठेवायचो. आंबे पिकले आहेत की अजून कच्चे आहेत अशी सगळी माहिती आमच्याकडे असायची. आमच्या गॅँगमध्ये झाडावर अचूक नेम धरून मारणारे एकदोघेजण एकदम एक्सपर्ट होते. अन्य काहीजण चांगले टोकदार दगड शोधून आणायचे. मग सगळे जण मिळून संधी साधून आंबे-बोरं दगड मारून पाडायचो. एकत्र बसून पोटभर खायचो. हे करत असताना एवढ्या शिताफीनं करायचो की झाड ज्याच्या मालकीचं आहे त्याच्या हाती कधी लागलोच नाही. त्या वयात मुलं ज्या पद्धतीची मजा करातात तशी मजा आम्हीही केली.(मनस्विनी प्रभुणे संपादित ‘शाळेतील दिवस’ या समदा प्रकाशनच्या पुस्तकातून साभार,  मनोहर पर्रीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने हा लेख प्रसिद्ध केला. आज पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत. )

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा