शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 12:19 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे.मनोहर पर्रीकर व माझी मागच्या ४० वर्षापासून मैत्री असून स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चालन, डाऊन टू अर्थ असे व्यक्तीमत्व आम्ही सर्वांनीच गमावलेले असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या विकासाचे एक ‘आदर्श स्तंभ’ असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

पंकज शेट्ये

वास्को - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. मनोहर पर्रीकर व माझी मागच्या ४० वर्षापासून मैत्री असून स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चालन, डाऊन टू अर्थ असे व्यक्तीमत्व आम्ही सर्वांनीच गमावलेले असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (17 मार्च) निधन झाल्याचे वृत्त मिळताच उशिरा रात्री नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले. याप्रसंगी गोव्यात दाखल झाल्यानंतर बोलताना मनोहर पर्रीकर केवळ भाजपचे नेते नव्हते तर ते माझे जीवलग मित्र असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगून मागच्या ४० वर्षापासून आमची दोघांची मैत्री असल्याचे सांगितले. जेव्हा मी महाराष्ट्रातून भाजपचे काम करायचो तेव्हापासून आपण गोव्यात येत असून आमची दोघांची घनिष्ठ मैत्री होती असे गडकरी यांनी सांगितले. संघटनेच्या व आपल्या तत्वावर चालण्यासाठी वचनबद्द, एकदम विनम्र, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चाल - चलन यांचे मनोहर पर्रीकर एक चांगले उदाहरण असल्याचे गडकरी यांनी याप्रसंगी सांगून त्यांनी सतत गोव्याच्या विकासासाठी व हितासाठी काम केलेले असल्याचे म्हणाले.

मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याचा आणखी विकास कसा करायचा, गोमंतकीय नागरीकांच्या हितासाठी कसे काम करायचे याकरीताच झिजलेले असून त्यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. पर्रीकरांच्या निधनामुळे गोव्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मोठे नुकसान झाले असल्याचे गडकरी म्हणाले. जेव्हा भाजप गोव्यात शून्यातून वर येत होता तेव्हापासून मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपच्या विकासासाठी काम केलेले असून गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यात व लोकसभेत भाजपचे दोन्ही खासदार निवडून आणण्यामागे पर्रीकरांचा सिंहाचा वाटा असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी सतत गोव्याच्या विकासासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलेले असून असा नेता भविष्यात मिळणे एकदम कठीण असून त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी नेत्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्याच नव्हे तर देशाच्या हितासाठी सुद्धा अनेक उत्तम कामे केली असून देश त्यांना कधीच विसरू शकणार नसल्याचे ते शेवटी बोलताना म्हणाले.गोव्यातील ‘अटल सेतू’ या मांडवीवरील तिसऱ्या पूलाच्या उद्घाटन समारंभावेळी माझी व पर्रीकरांची शेवटची भेट

मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला ‘अटल सेतू’ पूलाच्या उद्घाटनाला बोलविल्यानंतर आपण या समारंभाला आल्यानंतर प्रथम त्यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या विकासाचे एक ‘आदर्श स्तंभ’ असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त करून ‘अटल सेतू’ पूलाच्या उद्घाटनाच्या वेळी आमची दोघांची शेवटची भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाgoaगोवा