शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर जेव्हा राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना चिमटा काढतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:10 IST

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले असल्याने मी देखील राहुलजींचे अभिनंदन करतो. जरी राहुल अध्यक्ष बनल्याने घराणेशाहीचे एक सर्कल पूर्ण झालेले असले तरी ही एक मोठी घटना असून आपण अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत त्यामुळेच सहभागी होतो, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.

पणजी- राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले असल्याने मी देखील राहुलजींचे अभिनंदन करतो. जरी राहुल गांधी अध्यक्ष बनल्याने घराणेशाहीचे एक सर्कल पूर्ण झालेले असले तरी ही एक मोठी घटना असून आपण अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत त्यामुळेच सहभागी होतो, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.

राहुल गांधी यांचे अभिनंदन करणारा ठराव विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य काँग्रेस आमदारांनी मिळून विधानसभेत मांडला होता. आपणही काँग्रेस आमदारांच्या या ठरावाला पाठींबा देतो असे मनोहर पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी घराणेशाहीचे वर्तुळ पूर्ण झाले, असा उल्लेख केला तेव्हा काँग्रेसच्या आमदारांच्या चेहर्‍यावरील भाव बदलले. मात्र भाजपाच्या काही आमदारांच्या चेहर्‍यावर हास्याची सूक्ष्म छटा उमटली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही गांधी यांचे अभिनंदन केले. गांधी कुटूंबाने देशाची सेवा केली व देशासाठी खूप त्याग केला असल्याचेही आलेमाव म्हणाले.

काँग्रेसचे आमदार रवी नाईक, इजिदोर फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, नीलकंठ हळर्णकर, दिगंबर कामत आदींनी गांधी याचे अभिनंदन करणारी भाषणे केली व राहुलजींना भेटल्यानंतर त्याना आलेले काही अनुभवही सांगितले. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला होता. राहुल गांधी यांनीही यापूर्वी मंत्रीपद स्वीकारले नाही. आता प्रतिकूल स्थितीत त्यानी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. काँग्रेसला ते गतवैभव मिळवून देतील असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, सुभाष शिरोडकर आदी म्हणाले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरRahul Gandhiराहुल गांधी