शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रिकरांनी 2020 पर्यंत गोवा प्लास्टिक मुक्त करण्याचं लोकांना केलं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 15:04 IST

गोवा राज्य 2020 पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्यास राज्य सरकारला लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी केले. 

ठळक मुद्देगोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करा.सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरजपाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा

पणजी, दि. 15 - गोवा राज्य 2020 पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्यास राज्य सरकारला लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी केले. स्वातंत्र्यदिनाच्या पाश्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 2020 पर्यंत गोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करा. यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. गोव्यात राज्य सरकारने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घातली आहे.  मात्र, आपण सर्वांनी आत्तापासून प्लॉस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे टाळावे. तसेच, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरु नका. तरच, गोवा राज्य प्लास्टिक मुक्त होऊ शकतो. याचबरोबर, मनोहर पर्रिकर यांनी प्लॉस्टिकच्या पिशव्यातून कचरा रस्त्यांवर किंवा समुद्र किना-यावर फेकणा-यांना सुद्धा त्यांची सवय बदलण्याचे आवाहन यावेळी केले. देशात आणि राज्यात प्राथमिक शिक्षण गुणवत्ता सुधारली पाहिजे. यासाठी सुद्धा सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असेही मनोहर पर्रिकर म्हणाले.दरम्यान, गोव्यात गेल्या जुलैपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री व खरेदीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. या पिशव्यांची जर कोणी खरेदी किंवा विक्री करताना कुणी आढळून आला तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी....राष्ट्रीय हरित प्राधिकरण (एनजीटी) या संघटनेने राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाड असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ति स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अशी घोषणा करण्यात आली आहे की, जर कोणत्या व्यक्तीने अशा प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्यास पर्यावरणीय नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.