शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

प्रशासन सक्रिय करण्यास प्राधान्य, म्हादई व खाण प्रश्न हाताळूच : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:41 IST

खाणींचा प्रश्न लवकरच केंद्राकडे नेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

पणजी : निवडणूक आचारसंहिता आता उठलेली असल्याने राज्य प्रशासन सक्रिय करण्यासाठी आपण प्राधान्य देईन. तसेच म्हादई पाणी प्रश्न व राज्याचा खनिज खाणप्रश्न आपण प्राधान्याने हाताळीन, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.चौघा नव्या आमदारांच्या शपथविधी सोहळ्य़ानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की निवडणूक आचारसंहितेच्या काळात काही प्रकल्प अडकले. काही कामे प्रलंबित राहिली. ती मार्गी लावली जातील. प्रशासनाची घडी मला नीट करायची आहे. शिवाय म्हादई पाणीप्रश्न व खनिज प्रश्नही सोडवायचा आहे. खनिज खाणी लवकर सुरू करण्यासाठी प्राधान्य आहे. आपण अजून हा विषय नव्याने केंद्र सरकारकडे मांडला नाही, कारण केंद्रातील नवे सरकार स्थिरस्थावर होऊ द्या. खाण मंत्रालय सांभाळणारे नवे मंत्री कोण तेही स्पष्ट होऊ द्या. मग मी केंद्राकडे गोव्याचा प्रस्ताव घेऊन जाईन.मंत्र्यांना अतिरिक्त खाती लवकर देणार काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की अगोदर आपण सर्व मंत्र्यांशी चर्चा करीन. त्यांची काय अपेक्षा आहे हे जाणून घेईन. त्यांना कोणते खाते हाताळणो जास्त आवडेल हे मी विचारून घेईन. तसेच आमदारांशी महामंडळांच्या विषयाबाबत बोलेन व मग पाऊले उचलीन. सध्या मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा मात्र निर्णय झालेला नाही. येत्या 4 रोजी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेण्याचा विचार आहे.4 जून रोजी अधिवेशनसभापतींची निवड करण्यासाठी 4 जून रोजी विधानसभा अधिवेशन बोलविण्याचा विचार आहे. तारीख अजून निश्चित झालेली नाही. मंत्री विजय सरदेसाई व अपक्षांशी बोलून मी तारीख निश्चित करीन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी मात्र येत्या 4 रोजी विधानसभा अधिवेशन होईल, असे पत्रकारांना सांगितले. अनेक दिवसांचे मोठे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ात बोलविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.दरम्यान, आपल्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार तीन वर्षाचा उर्वरित काळ पूर्ण करील. आमचे सरकार भक्कम आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातून कुणाला वगळण्याचा वगैरे निर्णय नाही. सत्ताधारी आघाडीतील सहकारी पक्ष व अपक्षांना सोबत घेऊन आपण पुढे जाईन. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारला पूर्वी दिलेले पाठींब्याचे पत्र मागे घेतले की नाही ते मला ठाऊक नाही. त्यांनी जर पाठींबा मागे घेतला नाही तरी, आमची हरकत नसेल. उद्या चर्चिल आलेमाव यांनी जरी आमच्या सरकारला पाठींबा दिला तरी, आम्ही त्या पाठींब्याचे स्वागत करू. आलेमाव पाठींबा देतो असे अनेकदा सांगतात पण त्याविषयीचे पत्र मात्र देत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा