शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत किमत २०० रुपये करा, काजू उत्पादकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:02 IST

या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात.

- नारायण गावस 

पणजी : यंदाच्या वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून अनेक शेतकऱ्यांना  याचा फटका बसला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी आता राज्यभरातून शेतकऱ्यांकडून केली जात आहे. किमान दोनशे रुपये आधारभूत करावी अशी मागणी होत आहे. यंदा उत्पादन ५० टक्क्यांनी  कमी झाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी आधारभूतसाठी अर्ज केले हाेते यातील काही शेतकऱ्यांना अजूनही आधारभूत  किमत मिळालेली नाही.

या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात. पण यंदाच्या वर्षीही सरकारने काजू उत्पादकांना आधारभूत देण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या वर्षी १२५ रुपये दर होता यंदा काजू दर हा १११ ते ११३ रुपये पर्यंत आहे. त्यामुळे या वर्षी आधारभूत किमान २०० रुपये द्यावी अशी मागणी होत आहे. यंदा लागवडही कमी आणि दरात खूप कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा त्रास झाला. त्यामुळे  सरकारने आधारभूत किमती वाढ करावी. सत्तरी काणकोण केपे अशा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हा पूर्णपणे काजू उत्पादनावर अवलंबून असतात.  त्यामुळे या शेतकऱ्यांना या वर्षी मोठी आर्थिक अडचण समारा जावे लागणार आहे. 

या वर्षी काजूच्या मशागतीसाठी केलेला खर्चही उभा झालेला नाही. काजू रोपट्यांना खत घालणे तसेच गवत कापणी त्यांना पाणी देणे यासाठी कामगारांची मोठी आवश्यकता असते. या कामगारांचा रोजंदारीवर खूप खर्च येत असतो. त्यांना केलेला खर्चही  या काजू उत्पादनातून उभा होत नाही. त्यामुळे सरकारने यंदा किमान २०० रुपये आधारभूत किमत करावी असे सत्तरीतील शेतकरी रामा गावकर यांनी सांगितले. काणकोणचे शेतकरी कृष्णा वेळी म्हणाले, आता काजू व्यावसाय परवडत नाही तसेच पूर्वी सारखा दरही नाही आणि उत्पादनही मिळत नाही. त्यामुळे हा व्यावसाय करणे कठीण झाले आहे. जर सरकारला आता हा व्यावसाय शेतकऱ्यांकडून करुन घ्यायचा असेल तर त्यांना अर्थिक सहाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान २०० रुपये आधारभूत किमत द्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा