शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेले तिळारी धरण भरले 98 टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:49 IST

महाराष्ट्र तसेच गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेल्या तिळारी धरणातील जलसाठा क्षमतेपर्यंत भरला असून धरणातील सध्याचा पाण्याचा साठा ९८ टक्के आहे.

म्हापसा - महाराष्ट्र तसेच गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेल्या तिळारी धरणातील जलसाठा क्षमतेपर्यंत भरला असून धरणातील सध्याचा पाण्याचा साठा ९८ टक्के असल्याची माहिती तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता रमेश दाकटुले यांनी दिली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता दूर झाली आहे.

धरणात एकूण ४४७.२ दशलक्ष घन मीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने तसेच मागील काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे धरण क्षमतेपर्यंत भरल्याचे ते म्हणाले. धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. तिळारी प्रकल्पातून गोव्याला ७३.३ टक्के तर महाराष्ट्राला २६.७ टक्के पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. परिसरात जास्त प्रमाणावर पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला नाही; पण पावसाळ््यात अचानकपणे पाऊस वाढल्यास धरण भरण्याची शक्यता असते त्यामुळे ठरावीक कालावधीत पाणी बाहेर सोडावे लागते. या वर्षी सुद्धा पावसाळ्यात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात आल्याची माहिती रमेश दाकटुले यांनी दिली. सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा पुढील वर्षी पावसाळा सुरु होईपर्यंत मुबलक असा आहे. 

पावसाळ्याचा हंगाम संपल्यात जमा असला तरी आॅक्टोबरच्या शेवटीपर्यंत पावसाच्या सरी अधून मधून कोसळत असतात. त्यामुळे धरणातून पाणी सोडणे शक्य होत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात कालव्यांची दुरुस्ती हाती घ्यावयाची असल्याने अंदाजीत दिड महिन्यासाठी दोन्ही राज्यांना धरणातून होणारा पुरवठा बंद ठेवण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबराच्या शेवटी धरणातून पुरवठा सुरु करण्यात येत असतो. 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागा बरोबर उत्तर गोव्यातील बार्देस, पेडणे तसेच डिचोली हे तीन तालुके या धरणावर अवलंबून आहेत. गोव्यात कृषी सिंचना बरोबर उत्तर गोव्यातील अस्नोडा तसेच चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला यातून पुरवठा होत असतो. या जलशुद्धीकरण प्रकल्पातून लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. ज्या काळात तिळारी धरणातून पुरवठा बंद असतो त्या काळात जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते.  

टॅग्स :goaगोवा