शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

एम. व्ही. डॉमिनो कॅसिनोला 16 जानेवारीपूर्वी जेटी, सरकारचे न्यायालयात निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 21:40 IST

गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनोला १६ जानेवारीपर्यंत जेटी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. प्रदोष यांनी न्यायालयात सांगितले.

पणजी: गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनोला १६ जानेवारीपर्यंत जेटी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. प्रदोष यांनी न्यायालयात सांगितले. त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनो जहाजाला पणजी जेटी वापरायला देण्याच्या बाबतीत सरकारने ८ दिवसांत काय तो निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने २० डिसेंबर रोजी दिला होता आणि या कॅसिनो जहाजाला जेटी देणार असल्याचे सरकारच्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले होते.मंगळवारी हे प्रकरण सुनावणीला आले तेव्हा या कॅसिनोला जेटी देण्याची प्रक्रिया विल का होत आहे, असा प्रश्न केला. तेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. गोल्डन ग्लोब कंपनीचा लकी ७ कॅसिनो जहाज मिरामार किना-यावर रुतल्यानंतर ते नादुरुस्त बनले होते. ते दुरुस्तीसाठी इतरत्र हलविण्यात आल्यानंतर ते पुन्हा मांडवीत आणण्यासाठी मागितलेली परवानगी सरकारने नाकारली होती.गोल्डन ग्लोबच्या कॅसिनोसाठी परवानगी आहे, परंतु जेटी मंजूर करण्यात आली नव्हती. त्यामुळे मांडवीत नांगरणा-या महाराजा जहाजाचाच उपयोग करून कॅसिनो सुरू करण्यात येणार आहे. त्याला एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनो असे नावही देण्यात आले आहे. कंपनीने त्यासाठी जेटी मागितली होती. गोल्डन ग्लोब कंपनीकडून थकबाकी आणि परवाना शुल्काच्या रुपाने सरकारने ५० कोटी रुपये वसूल करून घेतले होते. त्यामुळे कंपनीला जेटी वापरायला दिलीच पाहिजे, असा आग्रहही सुनावणीदरम्यान कंपनीकडून धरला होता. १६ जानेवारी पूर्वी या कॅसिनोला जेटी मिळणार असल्यामुळे याच महिन्यात मांडवीत सहावा कॅसिनो सुरू होण्याची पूर्ण शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवा