शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 1.11 कोटीत आटोपली गोव्यातील लोकसभा निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 18:52 IST

 मडगाव - साधी पंचायत निवडणूक लढवायची झाल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च किती येत असेल याची ...

 मडगाव - साधी पंचायत निवडणूक लढवायची झाल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च किती येत असेल याची कल्पना न केलेली बरी. मात्र निवडणूक आयोगाला जो खर्चाचा तपशील दिला जातो तो खरेच प्रत्यक्षात केलेला खर्च असतो का? कारण निवडणूक आयोगाकडून जी अधिकृत आकडेवारी मिळाली आहे त्यानुसार गोव्यातील दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका केवळ 1.11 कोटी रुपयांतच आटोपल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात उमेदवारांनी दिलेला खर्चाचा तपशील केवळ 58 लाखांच्या घरात आहे. मात्र निवडणूक आयोगाने केलेली खर्चाची बेरीज दुप्पट आहे.दक्षिण गोवा मतदारसंघात आतार्पयत जो खर्चाचा तपशील दिला आहे त्यात सर्वात जास्त खर्च आम आदमी पक्षाचे एल्वीस गोमीस यांनी केला असून त्यांनी 10.93 लाख रुपये खर्च दाखविला आहे. मात्र त्यांच्या झालेल्या सभा लक्षात धरुन हा खर्च 17 लाख होत असल्याचे आयोगाच्या खर्च निरीक्षकांनी म्हटले आहे.भाजपाचे विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांनी सादर केलेला खर्चाचा तपशील केवळ 1.05 लाख एवढा असून प्रत्यक्षात त्यांचा खर्च 36 लाखांच्या आसपास असू शकतो असे आयोगाच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांनी सादर केलेला खर्च 6.43 लाख असून प्रत्यक्षात त्यांना 15 लाख खर्च आला असल्याचा निरीक्षकांचा दावा आहे. शिवसेनेच्या राखी नाईक यांनी खर्चाचा तपशील दाखविला आहे तो साडेतीन लाख असून त्यांचा प्रत्यक्षातील खर्च साडेसात लाख अपेक्षित आहे. दोन अपक्ष उमेदवार कालिदास वायंगणकर आणि मयूर काणकोणकर यांनी सादर केलेला खर्च 83 हजार एवढा असून निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या मते हा खर्च 47 हजार एवढाच आहे. एकूण सहा उमेदवारांनी जो खर्चाचा तपशील आतार्पयत दिला आहे तो 22.72 लाख एवढा असून आयोगाच्या निरीक्षकांप्रमाणे प्रत्यक्षातील हा खर्च 75.97 लाख एवढा असेल. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी सादर केलेला खर्चाचा तपशील 18.07 लाख एवढा आहे. काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा 12.84 लाख, आपचे प्रदीप पाडगावकर यांचा खर्च 3.41 लाख, रिपाईचे अमीत कोरगावकर यांचा खर्च 43 हजार तर अपक्ष उमेदवार ऐश्र्वर्या साळगावकर यांचा खर्च 38 हजार तर सदानंद कामत यांचा खर्च 25 हजार एवढाच दाखविण्यात आला आहे. 

टॅग्स :Goa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग