शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

लोकसभा निवडणूक २०२४: चारही मंत्र्यांची लागणार कसोटी; फोंडा तालुक्यात दाखवावे लागणार कसब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2024 07:44 IST

संघटितपणे काम करावे लागणार

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क : संपूर्ण तालुक्याच्या आढावा घेता भाजप विरुद्ध आरजी, अशी लढत होण्याची चिन्हे निदान तालुक्यात दिसत आहेत. इथल्या चारही आमदारांना मंत्रिपदे मिळालेली असल्याने त्यांना सुद्धा येथे चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. त्यात रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर, गोविंद गावडे यांना आपले कसब दाखवावे लागेल, त्यामुळे ते सर्वजण आतापासूनच कामाला लागलेले आहेत. ही सुद्धा भाजपसाठी एक जमेची बाजू आहे.

सध्या फ्रान्सिस सार्दिन हे खासदार आहेत. परंतु त्यांनी या तालुक्यात आपले अस्तित्व दाखवण्यासाठी विकासकामे केली नाहीत. त्याचा रोष अप्रत्यक्षपणे लोक काँग्रेसच्या उमेदवारावर काढतील, तालुक्यात फक्त फोंडा मतदारसंघात काँग्रेसला समाधानकारक मते मिळतील, अन्य ठिकाणी हजाराच्या आसपास सुद्धा मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे राजकीय तज्ज्ञ सांगतात.

रवी नाईक भाजपात गेल्यानंतर चित्र बदलले

फोंडा मतदारसंघात मागच्या वेळी रवी नाईक हे काँग्रेसमध्ये होते, साहजिकच त्यांनी काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाची ताकद निम्म्याने कमी झाली होती. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार लवू मामलेदार हे फक्त तीन हजार मते घेत चौथ्या स्थानी होते, पराभव झाल्यानंतर लवू मामलेदार किंवा मगो पक्षाने येथे तेवढी हालचाल केली नाही. परिणामी लोकसभा निवडणुकीत त्यांची ताकद अपेक्षित अशी नव्हतीच. भाजपने मात्र इथे संपूर्ण ताकद पणाला लावली होती. कारण सावईकर हे स्थानिक असल्याने तो प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता.

चैतन्य हरपले, तरीही...

भाजप नरेंद्र सावईकर यांनाच उमेदवारी देणार असे वातावरण निर्माण झाल्यामुळे फोंड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे चैतन्य पसरले होते, ते कुठेतरी कमी झाल्याचे जाणवत आहे. कारण, दक्षिण गोव्यात भाजप महिला उमेदवारासाठी प्रयत्न करीत आहे.

प्रियोळमध्येही बदलली समीकरणे

प्रियोळ मतदारसंघातसुद्धा असेच काहीसे वातावरण आहे. विरोधी पक्षाकडून येथे कोणतीही हालचाल झालीच नाही. त्यात मगो, भाजप सत्तेत आहेत, एक आहेत. हा मतदा रसंघ उत्तर गोवा लोकसभा मतदार संघात येतो. आमदार व मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रभावाखाली हा मतदा रसंघ हळूहळू येत आहे. दीपक उवळीकर यांनासुद्धा भाजपसाठी काम करावे लागेल. विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाने येथे तीन हजारपेक्षा अधिक मते घेतली होती. त्यामुळे भाजपच नंतर इथे आरजीलाच जास्त मते मिळतील, कारण, येथे काँग्रेस व इतर पक्षांचे अस्तित्व असून नसल्यासा रखेच आहेत. येथे सुद्धा महिला मतदारांची संख्या ही ८०० मतांच्या फरकाने पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. पुरुष मतदार १५,००८ एवढे आहेत तर महिला मतदार १५८२७ एवढे आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात महिलांची उपस्थिती पाहता येथे सुद्धा ही वाढीव मते त्यांच्याच पारड्यात पडतील.

२०१९च्या तुलनेत झाला मोठा बदल

येथील तालुक्याचे विश्लेषण करता तीन मतदारसंघ हे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात येतात, तर एक मतदारसंघ प्रियोळ हा उत्तर गोवा मतदारसंघात आहे. २०१९ च्या निवडणुकीचा विचार करता २०२४ मध्ये खूप काही बदल निश्चितपणे आढळून येत आहेत. जे काही बदल झाले, ते भाजपसाठी पोषक असेच आहेत, किंबहुना भाजपने २०२४ लोकसभा निवड णुकीचा विचार करूनच सर्व काही बदल घडवून आणले, असे राजकीय विश्लेषण म्हणतात.

प्रभाव कितपत पडणार

मागच्या लोकसभा निवडणुकीत अस्तित्वात नसलेला आरजी पक्ष यावेळी प्रमुख पक्षांना टक्कर देणार आहे. परंतु, फोंडा मतदार संघाचा विचार करता, त्यांचे येथे काम ठप्प आहे. विधानसभेसाठी त्यांचे जे उमेदवार होते, ते नंतर कुठेच दिसलेले नाहीत. फोंड्यात जे काही कार्यक्रम राबविले जातात, ते मडकई व शिरोडा मतदारसं घातील कार्यकर्त्यांकडून राबविले जातात. नाही म्हणायला कुर्टी भागात आरजीचे अस्तित्व काही प्रभागात आहे, परंतु, विधान सभेला जेवढी मते मिळाली, तेवढी लोकसभेला मिळण्याची आशा तशी धूसरच आहे, असे राजकीय तज्ज्ञ सांगतात. आरजी पक्षाने जाहीर केलेले उमेदवार हे आदिवासी समाजातील असल्याने कुटी खांडेपार भागातील आदिवासी समाजाची मते काही प्रमाणात त्यांना पट्ट शकतात.

शिरोडा मतदारसंघात पूर्वी सुभाष शिरोडकर यांच्यामुळे काँग्रेसला पूरक वातावरण असायचे. परंतु सध्या तेच भाजपमध्ये आहेत. पुन्हा काँग्रेसला येथे तोलामोलाचा नेता असा मिळालाच नाही. म गो पक्षाचे संकेत नाईक मुळे हे अधून मधून लहानसहान कार्यक्रम करत असतात. एक विरोधक म्हणून जर सध्या आवाज आरजी पक्षाचा आहे, विधानसभा निवड णुकीत ५ हजारपेक्षा अधिक मते आरजीच्या शैलेश नाईक यांनी घेतली होती. महार्दव नाईक हे सुद्धा अप्रत्यक्षपणे भाजपसाठीच काम करतील, अशी त्यांची देहबोली आहे. किंवा ते तटस्थ राहतील.

विखुरलेला विरोधक ही भाजपची ताकद

विखुरलेला विरोधक ही इथे भाजपची ताकद बनणार आहे. येथे पुरुष मतदार १४३४५ आहेत, तर महिला मतदार १५१९७ आहेत. महिला मतदारांची वाढलेली संख्या सुद्धा भाजपकडे येण्याची शक्यता आहे. कारण, महिला वर्गात एक विशेष आदर निर्माण आला आहे. मडकई मतदारसंघात सुद्धा विरोधी पक्ष हा शोधून सुद्धा तूर्तास सापडत नाही. इथे जे दोन प्रमुख पक्ष होते, ते मगो व भाजपच होते. सध्या दोन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपला काम करतील, काँग्रेस येथे १०० मते काढू शकणार नाही. अशी सध्याची स्थिती आहे. मागच्यावेळी ढवळीकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामु‌ळे त्यांनी दहा हजारांचा आकडा पार केला होता. परंतु यंदा समीकरणे वेगळी आहेत. इथेसुद्धा आरजी पक्ष चांगल्या प्रमाणावर मते काढण्याची शक्यता आहे. कारण, त्यांचे प्रेमानंद गावडे है सातत्याने वावरत असतात. येथे आदिवासी समाजाची मते आहेत. ढवळीकर यांनी हा मतदार संघ स्वतःला हवा तसा बांधून घेतलेला असल्यामुळे मतांना गळती लागणे तसे अशक्यप्राय आहे.

पक्षांच्या जमेच्या बाजू

यावेळी परिस्थिती भाजपसाठी तरी चांगली अशीच आहे, कारण, भंडारी समाजाचे बलाज्य नेते रवी नाईक आज भाजपमध्ये आहेत. डॉ. केतन भाटीकर यांच्या रूपाने मगोची ताकद सुद्धा दुपटीने वाढली आहे. दोन्ही पक्षांकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. राजेश वेरेकर हे एकहाती इथला काँग्रेसचा किल्ला लढवत आहेत. कामगार नेते हृदयनाथ शिरोडकर हे हल्लीच काँग्रेसमध्ये आल्याने राजेश यांला तेवढेच बळ मिळाले आहे. तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते वेरेकर यांनी निर्माण करून ठेवले आहेत. ती काँग्रेसकरता जमेची बाजू आहे.

 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४