शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पहली बार, लोकसभेसाठी मतदान; 'ही' जमात पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:30 IST

आतापर्यंत मतदानापासून वंचित राहिलेली जमात करणार मतदान

पणजी : राजधानी शहरापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या निरंकाल, दाभाळ येथील वानरमाऱ्यांना लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी प्रथमच प्राप्त झाली आहे. शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीही त्यांना मतदान करता येईल. ही जमात मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली होती. काही जागरुक नागरिकांनी पुढाकार घेऊन २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी प्रथमच ही जमात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार आहे. निरंकाल येथे सुमारे 100 वानरमारे असून 40 जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. यात 20 महिलांचा समावेश आहे. २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शंभर टक्के मतदान केले होते. लोकसभेसाठी ते प्रथमच मतदान करणार आहेत. वानरांना मारणारी ही जमात दाट जंगलात वास्तव्य करुन होती. नंतर ती निरंकाल येथे स्थायिक झाली. सामाजिक कार्यकर्ते दिवंगत सतिश सोनक आणि कृषीतज्ञ सतीश तेंडुलकर आदींनी पुढाकार घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. त्यांना रेशन कार्डे मिळवून देण्यात अनेक वर्षे गेली. आधार कार्ड तसेच मतदार कार्डे मिळवून देण्यातही बऱ्याच अडचणी आल्या. वन्य प्राणी संवर्धन कायदा लागू झाल्यानंतर वन्य प्राण्यांच्या हत्त्येवर निर्बंध आले. त्यामुळे या वानरमाऱ्यांचा व्यवसाय बुडाला. लोकसभेसाठी प्रथमच मतदान करणार असलेले गोपाळ वसंत पोवार यांनी आपण मतदान करण्यासाठी अगतिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आजपर्यंत मतदान म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हते. मुख्य प्रवाहापासून आम्ही दूर आणि वंचितच होतो. लोकसभा निवडणुकीत अपेक्षा विचारल्या असता एका ६५ वर्षीय ज्येष्ठ वानरमाऱ्याने सांगितले की, स्वच्छतागृहे आणि वीज पुरवठा या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. वानरमाऱ्यांच्या मुलांना शाळा प्रवेशासाठीही अनेक अडचणी आल्या. कारण जंगलात जन्म झाल्याने जन्म नोंदणी झालीच नाही आणि जन्मतारखांबाबतही पालक अनभिज्ञ आहेत. मात्र शिक्षण हक्क कायद्याखाली (आरटीई) या मुलांची शैक्षणिक अडचणही दूर करण्यात आली, असे तेंडुलकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९goaगोवाVotingमतदान