शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

खाण खात्याला आंदोलकांकडून कुलूप, चावी पोलिसांकडे सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 6:34 PM

राज्यातील खनिज खाण घोटाळा प्रकरणी जबाबदार धरून गोवा फाऊंडेशन ह्या संस्थेने आपल्या काही समर्थक आंदोलकांना सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी खाण खात्याच्या पणजीतील मुख्यालयाला कुलूप लावण्याची कृती केली.

पणजी : राज्यातील खनिज खाण घोटाळा प्रकरणी जबाबदार धरून गोवा फाऊंडेशन ह्या संस्थेने आपल्या काही समर्थक आंदोलकांना सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी खाण खात्याच्या पणजीतील मुख्यालयाला कुलूप लावण्याची कृती केली. या नव्या कुलूपाची चावी गोवा फाऊंडेशनचे क्लॉड अल्वारीस आणि अन्य पदाधिकारी व कार्यकत्र्यानी पणजी पोलिसांकडे सुपूर्द केली.गोवा फाऊंडेशन संस्था बेकायदा खनिज खाणींविरुद्ध सातत्याने आंदोलने करत आली आहे व न्यायालयीन लढाईही लढत आली आहे. अल्वारीस यांनी शनिवारी प्रथम आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाने खनिज लिज रद्दचा आदेश दिल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी लोटला पण सरकारने कायदेशीर पद्धतीने खाणी सुरू करण्यासाठी या तीन महिन्यांत काहीही केले नाही. कोणतीही योजना सरकारने तयार केलेली नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करू, असे सरकार सांगत आहे, असे क्लॉड अल्वारीस म्हणाले. तीन मंत्र्यांची समिती ही काहीच कामाची नाही. ती केवळ शोभेपुरती आहे. खनिज लिज रद्दचा आदेश गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. गेल्या तीन महिन्यांत सरकार खाणी सुरू करण्याबाबत योजनाच तयार करू शकले नाही. सरकारला यापुढे आम्हीच योजना सादर करू. यासाठी आम्ही ट्रक मालक व बार्ज मालकांशी चर्चा सुरू करणार आहोत. त्या घटकांना आम्ही आमच्यासोबत घेऊ व कायदेशीर पद्धतीने खाणी सुरू करण्याचा मार्ग खुला करू, असे अल्वारीस यांनी सांगितले.खाणींचा लिलाव नको सरकारने खनिज खाणींचा लिलाव पुकारू नये. त्याऐवजी सरकारने खनिज विकास महामंडळ स्थापन करावे आणि महामंडळामार्फत खाणी चालवाव्यात अशी मागणी अल्वारीस यांनी केली. महामंडळ स्थापन करण्याची मागणी आम्ही नव्याने करत आहोत. कारण सरकार लिलाव पुकारूच शकणार नाही हे गेल्या तीन महिन्यांत कळून आले आहे, असे अल्वारीस म्हणाले. लिज क्षेत्रत अजुनही 10 दशलक्ष टन खनिज माल पडून आहे. हा माल सरकारचा आहे. सरकारने त्याचा ई-लिलाव पुकारावा व महसुल प्राप्त करावा. या मालाच्या वाहतुकीचे काम ट्रक मालक व बार्ज मालकांना मिळेल. सरकारने दोनशे कोटींचा मिनरल फंड हा खाणपट्टय़ातील लोकांच्या हितासाठी वापरावा. ज्या खाण कंपन्या कामगारांना सेवेतून कमी करत आहेत, त्यांचा आम्ही निषेध करतो. खाणपट्टय़ातील लोकांना पाण्याचा पुरवठा होणो गरजेचे आहे, असे अल्वारीस म्हणाले.यावेळी आझाद मैदानावर अल्वारीस यांच्यासोबत पीडीएविरोधी आंदोलकही उपस्थित होते. या सर्वानी मिळून खाण खात्याकडे धाव घेतली व मिनेङिास ब्रागांझा इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या खाण खात्याला कुलूप ठोकले. काल शनिवार असल्याने खाण खात्याचे मुख्यालय बंद होते. तथापि, दार ओढून घेतलेले असले तरी,आत सुरक्षा रक्षक होते. त्यांना बाहेर बोलाविले गेले. ते बाहेर आल्यानंतर अल्वारीस यांच्या हस्ते खाण खात्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले गेले. 65 हजार कोटींच्या खाण घोटाळ्य़ाला खाण खात्याचे अधिकारी जबाबदार असून त्यांना तुरूंगात टाकले जावे, तसेच खाण खाते काही कामच करत नसल्याने हे खाते कायमचे बंद केले जावे, अशी मागणी अल्वारीस व इतरांनी केली. आंदोलक मग पणजी पोलिस स्थानकावर गेले व तिथे पोलिसांकडे चावी सुपुर्द केली गेली.