शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : गोव्यात लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांची शाहांसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 13:12 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : लॉकडाऊन पंधरा दिवस वाढला तरी, व्यायामशाळा, रेस्टॉरंट्स सुरू व्हायला हव्यात. पन्नास टक्के ग्राहकांसोबत ह्या सुविधा सुरू व्हाव्यात अशी मागणी लोक करतात.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आपण अमित शाह यांच्याशी फोनवर बोललो असे सांगितले. राज्यात रेस्टॉरंट्स आता खुली व्हायला हवी, ही सरकारची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पणजी : गोव्यात लॉकडाऊन आणखी पंधरा दिवसांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याशी शुक्रवारी फोनवर त्या दृष्टीकोनातून बोलणी झाली. मात्र गोव्यातील रेस्टॉरंट्स सुरू करण्याची मुभा केंद्र सरकारने द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी शहा यांना सूचविले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाची गोवा सरकारला प्रतीक्षा आहे.

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन येत्या दोन दिवसांत संपल्यानंतर देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. गोव्यात रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्यानंतर व रस्ता मार्गे वाहतुकही सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. परराज्यांतून कोरोना रुग्ण गोव्यात येतात. या पार्श्वभूमीवर गोव्यात लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढायला हवा, या मताचे गोवा सरकारही आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपण अमित शाह यांच्याशी फोनवर बोललो असे सांगितले. राज्यात रेस्टॉरंट्स आता खुली व्हायला हवी, ही सरकारची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. सोशल डिस्टंसिंग पाळून पन्नास टक्केच क्षमतेने रेस्टॉरंट्स सुरू करता येतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊन पंधरा दिवस वाढला तरी, व्यायामशाळा, रेस्टॉरंट्स सुरू व्हायला हव्यात. पन्नास टक्के ग्राहकांसोबत ह्या सुविधा सुरू व्हाव्यात अशी मागणी लोक करतात. आम्हीही याच मताचे आहोत. मात्र केंद्रीय गृह मंत्रलायाची नवी मार्गदर्शक तत्त्वे कशी काय येतात ते पाहावे लागेल.

राज्याला जेवढे स्वातंत्र्य असेल त्यानुसार पाऊले उचलली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. काहीजण मॉल सुरू करा अशीही मागणी करतात त्याविषयीही सरकार विचार करील. गोव्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय याचीही नोंद सरकारने घेतली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहा