शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेतून दारू तस्करी

By admin | Updated: July 28, 2014 02:19 IST

मोठ्या टोळीचा संशय : वर्चस्वासाठी एकमेकांवर प्राणघातक हल्ले

सूरज पवार-मडगाव : दारू तस्करीसाठी कोकण रेल्वेमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या गैरव्यवहारात गुंतलेली धेंडे आता आपल्या धंद्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांना संपविण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. गेल्या आठवड्यात दारूच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या दोन गटांनी भररस्त्यावरच हाणामारी करून त्याची झलकही दाखवून दिली आहे. याबाबत वेळीच पोलिसांनी कारवाई केली नाही तर भविष्यात हा धोका कायम असेल, ही भीती आता मडगावकरांना सतावू लागली आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच एका घटनेत पोलिसांना टिप्स देत असल्याच्या संशयावरून चारजणांना बेदम मारहाण करण्यात आली होती, तर मागच्या आठवड्यात बुधवारी मालभाट येथे भररस्त्यावर दोन गँगमध्ये राडा झाला होता. या वेळी चाकू, दंडुक्यांचाही वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. मालभाट येथे सुजित सिंग व कृष्णा पिल्ले या दोन गटांत हाणामारी झाली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही गट दारूच्या तस्करीत गुंतलेले आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या एका अधिकाऱ्याने दारू तस्करीविरोधात पावले उचलली होती. त्यातून या अधिकाऱ्याला गोळीबारही करावा लागला होता. त्यात एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर माागाहून त्या अधिकाऱ्याला खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगातही जावे लागले होते. अशा गोष्टीची पृनरावृत्ती होऊ नये यासाठी आता कोकण रेल्वे पोलीस विभाग तसेच रेल्वे सुरक्षा दलाला आतापासून मोहीम उघडून दारूच्या तस्करीत गुंतलेल्यांचा बीमोड करावाच लागेल. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तगुरूसांवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात दारू जप्त केल्याने दारू ‘स्मगलिंग’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. चालू वर्षात रेल्वे पोलिसांनी जानेवारी महिन्यात एका प्रवाशाकडून ३0 हजारांची दारू जप्त केली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रेल्वेतून दारूची तस्करी करत असल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी प्रदीप पांडे याला अटक केली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यातही मध्यरात्री हाच संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. त्याला अन्य दोन साथीदारांसमवेत ९0 हजार रुपयांच्या दारूसह पोलिसांनी जेरबंद केले होते. शेजारच्या राज्यात दारूची किंमत जास्त असल्याने गोव्यातून रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. गेल्या काही महिन्यांत कोकण रेल्वे पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्यांविरुध्द मोहीम उघडून लाखो रुपये किमतीची दारू जप्त केली होती. गेल्या जुलै महिन्यात कोकण रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीची विविध उत्पादनांची दारू जप्त केली होती. लॅन्सी कार्स्टा व नवीन कुमार अशी या दोघा संशयितांची नावे असून, ते केरळ राज्यातील कासरगोड येथील असल्याचे तपासात आढळून आले होते. गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेश येथील राजू सिंग याला अटक करून त्याच्याकडून २ हजार ८८0 रुपये किमतीची दारू जप्त केली होती. मे महिन्यात रिमा दा कॉस्ता याला ताब्यात घेऊन १0 हजार ५४0 रुपयांची दारू जप्त केली होती. सध्या पोलिसांकडे खबऱ्यांची वानवा असल्याने अनेकदा अनेक क्लृप्त्या वापरून भरदिवसा मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे.