शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण रद्द करण्यासाठी काँग्रेसचे नितीन गडकरी यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 19:02 IST

गोव्यात होऊ घातलेल्या सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सर्व स्तरांतून वाढता विरोध होत असतानाच या प्रकल्पाला गोव्यातील काँग्रेसनेही विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र गोव्यातील काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

मडगाव :  गोव्यात होऊ घातलेल्या सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सर्व स्तरांतून वाढता विरोध होत असतानाच या प्रकल्पाला गोव्यातील काँग्रेसनेही विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र गोव्यातील काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नद्यांचे राष्ट्रीयीकरण केल्यास या नद्यांच्या काठावर रहाणा-या मच्छीमारांच्या अधिकारावर गदा येणार असून त्यामुळेच हा लोकविरोधी निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापर्यंत या मागणीवर केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. अन्यथा काँग्रेस आपले पुढील धोरण स्पष्ट करणार असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही उपस्थित होते. गोव्यातील झुवारी व मांडवी या दोन प्रमुख नद्यांसह एकूण सहा नद्यांचे जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण होणार असून आतार्पयत गोव्यातील 190 पैकी 90 पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये या निर्णयाला तसेच कोळसा हबला विरोध केलेला आहे. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळाने आपली अधिकृत भूमिका केंद्रीय मंत्री गडकरी यांना कळविली आहे. सोमवारी स्पीडपोस्टने हे पत्र पाठविल्याची माहिती कवळेकर यांनी दिली. गोव्यात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कोळशाच्या वाहतूकीला उत्तेजन देण्याचे कारस्थान शिजत असल्याचा संशय व्यक्त करीत यामुळे संपूर्ण राज्यात लोकांमध्ये एकप्रकारचे साशंकतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव पुढे नेल्यास गोव्यात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही मात्र हे रुंदीकरण नेमके कशासाठी केले जाते हे लोकांना कळले पाहिजे. या प्रश्नात काँग्रेस लोकांबरोबर राहील असे कवळेकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा