लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : साळावलीसह राज्यातील चार प्रमुख धरणांमधील जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्क्यांपेक्षा खाली उतरली आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडल्यास पाण्याची समस्या निर्माण होईल की काय, अशी लोक व्यक्त करीत आहेत.
जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी मात्र तशी कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचे सांगताना पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, जून अखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी आहे.
राज्याच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई असताना नेते परराज्यांत प्रचार दौरे करत असल्याबद्दल काँग्रेसचे सुनील कवठणकर यांनी टीका केली आहे.
जलाशयात सध्या किती पाणी?
साळावली ४९ टक्केअंजुणे ३८ टक्केचापोली ५८ टक्केआमठाणे ३७ टक्केपंचवाडी ३९ टक्केगावणे ५६ टक्के