पणजी : सडा येथील तुरुंगात गेले दोन महिने शिक्षा भोगणारे माजी मंत्री व नुवेचे विद्यमान आमदार मिकी पाशेको यांना उर्वरित शिक्षा माफ केली जावी, अशी शिफारस राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. आपल्याला उर्वरित चार महिन्यांची शिक्षा माफ केली जावी म्हणून मिकी यांनी राज्यपालांकडे अर्ज केला होता. हा अर्ज राज्यपालांनी पडताळणीसाठी सरकारकडे पाठवला होता. त्यावर अॅडव्होकेट जनरल, कायदा खाते, तुरुंग प्रशासन व गृह खात्याचा सल्ला घेऊन मंत्रिमंडळाने विचार केला व मिकी यांना उर्वरित शिक्षा माफ करावी, असा निर्णय घेतला. राज्यपालांना मंत्रिमंडळाने शिफारस पाठवली आहे. राज्यपाल गोव्याबाहेर असून त्या येत्या सोमवारी गोव्यात येणार आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाचा हा निर्णय निषेधार्ह आहे. मी याविरुद्ध न्यायालयात आव्हान देणार असल्याचे उच्च न्यायालयाचे वकील तथा सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी सांगितले आहे. (खास प्रतिनिधी)
मिकीला सोडा!
By admin | Updated: July 31, 2015 02:06 IST