शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

भाजपा कोअर कमिटी बैठकीवर लक्ष्मीकांत पार्सेकरांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 22:16 IST

भाजपाच्या कोअर टीमच्या पाच सदस्यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची करंजाळे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

पणजी : भाजपाच्या कोअर टीमच्या पाच सदस्यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची करंजाळे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. मात्र माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे या बैठकीवेळी उपस्थित राहिले नाहीत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी येऊ शकले नाहीत. पार्सेकर व मांद्रेकर या दोघांनीही बोलविण्यात आले होते पण ते आले नाहीत. पार्सेकर यांनी तर बैठकीवर बहिष्कारच टाकल्याचे मानले जात आहे. सध्या पार्टीच्या कोअर कमिटीला काही अर्थ राहिलेला नाही. कोअर कमिटीमध्ये चर्चा करून जर निर्णय घेतले जात नसतील तर मग त्या कमिटीला व कमिटीच्या बैठकीला काही अर्थच राहत नाही, असे पार्सेकर यांनी सांगितले. अशा बैठकीला गेलो काय किंवा न गेलो काय तरी सारखेच, असे पार्सेकर म्हणाले. फ्रान्सिस डिसोझा हेही कोअर कमिटीचे सदस्य आहेत पण ते आजारी आहेत व त्यांनी कोअर कमिटीला रामराम ठोकल्यात जमा आहे, असे सुत्रांनी सांगितले.

राजेंद्र आर्लेकर, दत्ता खोलकर, सदानंद शेट तानावडे व संजीव देसाई हे कोअर कमिटी सदस्य मात्र पर्रीकरांना भेटले. पंधरा मिनिटे त्यांनी पर्रीकरांशी चर्चा केली. आम्ही फक्त पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीच बोललो. अन्य कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. पर्रीकर यांची प्रकृती आता बरी दिसली, असे तानावडे यांनी लोकमतला सांगितले.

भाजपा खासदार दिल्लीत गोव्यातील खनिज खाणी सुरू केल्या जाव्यात अशी मागणी घेऊन भाजपाचे तीन खासदार तसेच वीज मंत्री निलेश काब्राल आणि आमदार प्रमोद सावंत हे गुरुवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून आम्ही खाणी लवकर सुरू करा अशी मागणी मांडण्यासाठी भेटत आहोत, त्यामागे कोणताच राजकीय चर्चेचे कारण नाही, असे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले. भाजपाच्या चार मंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटावे, असे अगोदर ठरले होते पण त्याविषयी पुढे काही झाले नाही.

टॅग्स :goaगोवा