शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१९ डिसेंबरपर्यंत सर्व वननिवासींचे जमीनहक्क दावे निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:33 IST

उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वननिवासींना जमिनींचे हक्क बहाल करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. आतापर्यंत ८७१ दावे निकालात काढले असून सनदा बहाल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, १० हजार ५०० अर्ज आले होते. पैकी ८७१ निकालात काढले. वनक्षेत्रात जमीन येत नसल्याने ९४९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अन्य अर्जावर प्रक्रिया चालू आहे. १४ जून रोजी तब्बल दहा हजार प्रलंबित दाव्यांबाबत विशेष शिबिर घेतले जाईल. २१ जून रोजी सनदांशी संबंधित ग्रामसभा होतील. येत्या १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणे निकालात काढली जातील. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दोन्ही जिल्हाधिकारी तसेच या प्रकरणी नोडल अधिकारी म्हणून नेमलेले अजय गावडे व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. गोव्यात खास करून गावडा, कुणबी, वेळीप आधी अनुसूचित जमातींचे लोक वनक्षेत्रात निवास करून जमिनी कसतात, त्यांना जमिनीचे हक्क मिळायला हवेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात वनांमध्ये निवास करणारे अनेकजण तिथे जमिनीही कसतात. तिथे त्यांची वस्ती आहे. निवासीहक्क कायद्यानुसार त्यांना जमिनींच्या सनदा मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु गेली अनेक वर्षे हे दावे पडून आहेत. स्पॉट व्हेरिफिकेशन अर्थात जागेची पडताळणी, ग्रामसभांमध्ये मंजुरी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील दावे मंजूर झाल्यानंतर सनदा दिल्या जातात.

१४ जून रोजी ६ तालुक्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून प्रलंबित वनहक्क प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल. १०,५०० अर्जापैकी ८७१ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत आणि ९४९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. २१ जून रोजी सनदांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली जाईल. १५० सनदा वाटपासाठी तयार आहेत. १४ जून रोजी तब्बल दहा हजार प्रलंबित दाव्यांबाबत विशेष शिबिर घेतले जाईल. तर येत्या १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणे निकालात काढली जातील.

वनहक्क प्रतिनिधींचे सहकार्य मिळायला हवे

अनेकदा वनहक्क प्रतिनिधी बैठकांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे दावे रेंगाळतात. प्रत्येक गावात अशा समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यावरील सदस्यांनी सहकार्य करायला हवे. तसेच ग्रामसभांमध्ये आवश्यक ती गणपूर्ती व्हायला हवी. त्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करायला हवे, असे सरकारचे म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकार